पुण्यातील रस्त्यावर मद्यधुंद तरुणीचा गोंधळ; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 11:23 IST2021-08-04T11:22:27+5:302021-08-04T11:23:54+5:30

ही तरुणी प्रचंड दारू प्यायलेली होती. काळी जिन्स आणि लाल टॉप घातलेली ही तरुणी अगोदर रस्त्याच्या मधोमध उभी राहून येणार्‍या जाणार्‍या वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न करत होती. मग...

Drunken girl's rowdyism on the streets of Pune Video goes viral | पुण्यातील रस्त्यावर मद्यधुंद तरुणीचा गोंधळ; व्हिडिओ व्हायरल

पुण्यातील रस्त्यावर मद्यधुंद तरुणीचा गोंधळ; व्हिडिओ व्हायरल

पुणे- टिळक रोडवरील हिराबाग चौक परिसरात मंगळवारी रात्री एका मद्यधुंद तरुणींने चांगलाच गोंधळ घातला. तिचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हिराबाग चौकात रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. (Drunken girl's rowdyism on the streets of Pune Video goes viral)

ही तरुणी प्रचंड दारू प्यायलेली होती. काळी जिन्स आणि लाल टॉप घातलेली ही तरुणी अगोदर रस्त्याच्या मधोमध उभी राहून येणार्‍या जाणार्‍या वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर ती रस्त्यावर बसली. तिच्या आजू बाजूने बस, कार जात होत्या. काही वेळाने तर ती चक्क रस्त्यावर झोपली.




तिचे हे वागणे पाहून रस्त्यावर गर्दी जमली. त्यांच्यातील कुणीतरी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. स्वारगेट व खडक पोलीस ठाण्यातील मार्शल तातडीने तिथे पोहचले. पोलिसांनी तिला हटकले. पोलीस पाहिल्यावर ती चपापली आणि निघून गेली़. मात्र, तिचे रस्त्यावरील या गोंधळाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Web Title: Drunken girl's rowdyism on the streets of Pune Video goes viral