मद्यधुंद तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण; मगरपट्टा परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 12:26 IST2025-01-12T12:24:38+5:302025-01-12T12:26:11+5:30

या प्रकरणी हडपसर पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे.

Drunk youth beats up traffic policeman Incident in Magarpatta area | मद्यधुंद तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण; मगरपट्टा परिसरातील घटना

मद्यधुंद तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण; मगरपट्टा परिसरातील घटना

पुणे : मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने वाहतूक पोलिसासोबत वाद घालत त्यांना मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी मगरपट्टा परिसरात घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, या प्रकरणी हडपसर पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे.

हडपसर वाहतूक विभागातील पोलिस कर्मचारी शनिवारी (दि. ११) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मगरपट्टा परिसरातील रासकर चौक या भागात कर्तव्यावर होते. येथून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर ते कारवाई करत होते. त्यावेळी एक जण तिथे थांबलेल्या नागरिकाला दगडाने मारण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी येथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाने त्याला हटकले.

 

याचा राग आल्याने संबंधित तरुणाने वाहतूक पोलिसाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेची माहिती मिळताच हडपसर वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक तसेच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान, आरोपी हा मानसिक रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. हडपसर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Drunk youth beats up traffic policeman Incident in Magarpatta area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.