दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीकडून गळा दाबून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 21:09 IST2023-03-15T21:09:27+5:302023-03-15T21:09:38+5:30

दारूच्या आहारी गेलेला पती हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत असे

Drunk husband beaten to death by strangulation by his wife | दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीकडून गळा दाबून खून

दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीकडून गळा दाबून खून

राजणगाव सांडस : दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीनेच गळा दाबून खून केल्याची घटना शिरूर तालुक्यातील राक्षेवाडी येथे घडली आहे. विलास उर्फ विकास गलचंद चव्हाण (वय ३२, रा. मोहारडा तांडा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजी नगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून,पत्नी सविता विलास चव्हाण (वय ३०) यांना अटक केली आहे. याबाबत त्यांचे बंधू गोविंद गलचंद चव्हाण (रा. कासारसाई, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी त्यांची पत्नी सविता विरोध फिर्याद शिरूर पोलिसांनी मध्ये दाखल केली आहे. विलास चव्हाण यांच्या पत्नी सविता यांना शिरूर न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कन्नड तालुक्यातील विलास चव्हाण व त्यांच्या पत्नी सविता हे ऊस तोडणी मजूर राक्षेवाडी येथील उसाच्या गुऱ्हाळवर ऊस तोडणी करून उदरनिर्वाह चालवत होते. विलास चव्हाण हे दारूच्या आहारी गेलेले होते. ते पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून मारहाण करीत असत. दोन दिवसांपूर्वी रात्रीही त्यांच्यात भांडण झाले. यामध्ये  विलास याने दारु पिऊन पत्नीला मारहाण केली. त्याच पहाटे सविता चव्हाण हिने विलास यांचा गळा दाबून खून केला. विलास चव्हाण यांच्या मृत्यू प्रकरणी पत्नी सविता चव्हाण यांना अटक केलेली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव करीत आहे.

Web Title: Drunk husband beaten to death by strangulation by his wife