Pune | अण्णापूर-शिरूर रस्त्यावर कार विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 19:57 IST2023-02-06T19:52:19+5:302023-02-06T19:57:19+5:30

रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडून गाडीसह बुडून दुर्दैवी मृत्यू

Driver dies after car falls into well on Annapur-Shirur road pune crime news | Pune | अण्णापूर-शिरूर रस्त्यावर कार विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

Pune | अण्णापूर-शिरूर रस्त्यावर कार विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

टाकळी हाजी (पुणे) : अण्णापूर-शिरूर रस्त्यावर कार विहिरीत पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिरूर-अण्णापूर रस्त्यावरील अण्णापूर येथे राहुल गोपीनाथ पठाडे (रा. आसेगाव रस्ता, शेवगाव, जि. नगर) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

राहुल गोपीनाथ पठाडे हा पांढऱ्या रंगाची गाडी (एमएच-१६ एटी-१६६२ ) चालवत होता. दरम्यान, त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडून गाडीसह बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, चालक सहायक पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमाने यांनी धाव घेत परिसरातील नागरिकांच्या मदतीने गाडीसह त्याला बाहेर काढले. परंतु, उशिरा मदत मिळाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्यानुसार, हा युवक शिरुरकडून मलठणकडे आपल्या गाडीसह जात असताना तो पुन्हा येवले माथा येथून मागे वळून पुन्हा शिरुरकडे जात होता. यादरम्यान उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने त्याची गाडी रस्ता सोडून पंधरा फूट लांब असणाऱ्या कठडा नसलेल्या विहिरीत गेली.

Web Title: Driver dies after car falls into well on Annapur-Shirur road pune crime news