शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पुणेकरांना दाखविण्यात आलेले ‘ मुठा जलप्रवासाचे’ स्वप्न आजपर्यंत तरी ठरलेय ‘जुमला’च.. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 11:38 AM

शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नद्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने २०१० साली अहवाल तयार करुन राज्य शासनाला पाठविला होता.

ठळक मुद्देगटारगंगा ‘मुठा’ सुधारण्याच्या नुसत्या गप्पाच, कार्यवाही मात्र शून्यच.. सरकारे बदलली ; पण प्रगती सल्लागार निवडीपुरतीचमुळा-मुठा नदीच्या संवर्धनासाठी जपानच्या सहकार्याने ‘जायका’ प्रकल्प राबविण्याचा निर्णय २०१६ साली केंद्र शासन व जायका यांच्यात करार सद्यस्थितीत शहरात ९ मैलाशुध्दीकरण केंद्र कार्यरत

पुणे : मुळा-मुठा नदीच्या संवर्धनासाठी जपानच्या सहकार्याने ‘जायका’ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतू महापालिकेने २०१० साली राज्य शासनाला अहवाल पाठविल्यानंतर गेल्या नऊ वर्षात केवळ सल्लगाराची नेमणूक आणि सल्लागाराचा प्राप्त झालेला अहवाल यापलीाकडे काहीही झालेले नाही. पुणेकरांना ‘जलप्रवासाचे’ दाखविण्यात आलेले स्वप्नही अजूनपर्यंत ‘जुमला’च ठरले आहे. शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नद्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने २०१० साली अहवाल तयार करुन राज्य शासनाला पाठविला होता. राज्य शासनाने हा अहवाल केंद्र शासनाला पाठविल्यानंतर त्याला मान्यता मिळाली. त्यानंतर २०१६ साली केंद्र शासन व जायका यांच्यात करार झाला. २०१८ साली केंद्राने प्रकल्पासाठी सल्लागार कंपनीची नेमणूक केली. पालिकेने नुकतीच या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबविली. निविदांमधील आलेले ‘अ’ पाकिट उघडण्यात आले आहे. निविदा पुनर्मुल्यांकन समितीचा अहवाल सल्लागार कंपनीला सादर केला जाणार आहे. त्यानंतर चर्चा होऊन हा अहवाल जायकाला पाठविण्यात येणार आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर ‘ब’ पाकिट उघडले जाईल. त्यानंतर स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत आणखी किती काळ लागणार असा प्रश्न आहे.सद्यस्थितीत शहरात ९ मैलाशुध्दीकरण केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांच्या विस्तारीकरणासोबतच या योजनेंतर्गत आणखी नविन ११ केंद्रे प्रस्तावित आहेत. मात्र केंद्र आणि राज्य शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे नदीसुधार रखडला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या टोलवाटोलवीत पाच वर्षे गेल्यानंतर जायकासोबत अखेरीस करार झाला. मात्र त्यानंतर सल्लागाराची नेमणूक करण्यासाठी दोन वर्षे घालवण्यात आली. या प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यात पुण्यातले कारभारीही कमी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या  प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरु होण्यासाठी जुन-जुलै उजाडणार असल्याचे पालिकेतल्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. काम सुरु झाल्यानंतर अडीच वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर असणार आहे.चौकटसत्ता बदलली, नाकर्तेपणा तसाच राहिलानदी शुद्धीकरण योजनेसाठी पालिकेने ६७० कोटींचा अहवाल राज्य शासनाला सादर केला होता. मैलाशुद्धीकरण केंद्रांचे विस्तारीकरण, नव्याने उभारणी तसेच डेÑनेज संदर्भातील कामांचा यात उल्लेख होता. राज्य शासनाकडून हा अहवाल केंद्राला सादर झाल्यानंतर त्यात भूसंपादन, स्काडा, जनजागृती, सार्वजनिक शौचालयांची उभारणी, प्रशिक्षण, जनजागृती आदींची रक्कम समाविष्ट करुन प्रकल्पाचा खर्च ९९० कोटी रुपयांवर गेला. दरम्यानच्या काळात मणे महापालिका, राज्य आणि केंद्रात सत्तापालट झाला परंतु, मुठा नदीचे भाग्य अजून पालटलेले नाही.

चौकटअखंड निष्क्रियतासन २०१०         -अहवाल महापालिकेकडून राज्य शासनाकडेसन २०१२        - राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे अहवालसन २०१५        - केंद्र सरकारची प्रकल्पाला मान्यताजानेवारी २०१६        - केंद्र सरकार आणि जायका यांच्यात करारमार्च २०१८        - केंद्र सरकारकडून सल्लागाराची नेमणूक

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाmula muthaमुळा मुठाriverनदीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस