Video: पोलीस व्हायचे स्वप्न; पुण्यात मुलींचा भरतीसाठी संघर्ष; नियोजनात गोंधळ, गेटवरच चेंगराचेंगरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 12:25 IST2025-03-19T12:23:49+5:302025-03-19T12:25:00+5:30
एकूण 513 जागेसाठी ३ हजार मुली आल्या होत्या, भरती प्रक्रिया पार पाडत असताना अशा प्रकारचे गालबोट लागले

Video: पोलीस व्हायचे स्वप्न; पुण्यात मुलींचा भरतीसाठी संघर्ष; नियोजनात गोंधळ, गेटवरच चेंगराचेंगरी
किरण शिंदे
पुणे : आज सकाळी पुण्यातील शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात जो प्रकार घडला यावर पालकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली. पोलिस प्रशासनाकडून भरतीसाठी आलेल्या मुलींच्या रांगेतील नियोजनात गोंधळ उडाला. गेटवर झालेल्या गर्दीमुळे लोखंडी गेट तुटून पडला आणि त्यावरून मुली आत मध्ये पळत सुटल्या यावेळी चेंगरा चेंगरी आणि गर्दी झाली.
पोलीस व्हायचे स्वप्न; मुलींचा भरतीसाठी संघर्ष; नियोजनात गोंधळ, गेटवरच चेंगराचेंगरी#pune#Police#women#shivajinagarpic.twitter.com/qddkLQnama
— Lokmat (@lokmat) March 19, 2025
अनेक मुलींच्या पायाला गंभीर दुखापती झाल्या. यावेळी पालक संतप्त झाले. त्यांच्या डोळ्यासमोर पोलीस व्हायचे स्वप्न घेऊन आलेले आपल्या मुली. परंतु अशा संघर्षामुळे त्यांच्या मनामध्ये दुफळी निर्माण झाली. यावेळी स्थानिक पोलिसांशी बाचाबाची देखील झाली. पोलिस अधिकारी पवार म्हणून होते. त्यांना देखील पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. खरतर मुलींनी अनेक महिन्यांपासून या भरतीसाठी तयारी केली आहे. मैदानी चाचणीसाठी प्रचंड वेळ आणि मेहनत खर्ची केली आहे. सदरील भरती ही २०२२-२३ मधील पुणे कारागृह पोलिस भरती म्हणून रखडलेली आहे. एकूण 513 जागेसाठी ही रखडलेली भरती पार पडत आहे. इतर पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तिपत्रेही देण्यात आली. मात्र, पुणे कारागृह पोलिस भरतीचा अजूनही ठोस निर्णय होत नव्हता. परंतु आता कुठेतरी ही भरती प्रक्रिया पार पाडत असताना अशा प्रकारचे गालबोट लागत आहे. या पोलिसांच्या अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे मैदानी चाचणी मध्ये आपली मेहनत तर व्यर्थ जाणार नाही ना अशी भावना विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिसत आहे.