शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रातील रस्ता पंधरा दिवसांत काढा

By admin | Updated: January 15, 2015 00:17 IST

सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात येणारा रस्ता पूररेषेबाहेर हलविण्याचा आदेश

पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात येणारा रस्ता पूररेषेबाहेर हलविण्याचा आदेश दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाने बुधवारी महापालिकेस दिले आहेत. तसेच, या आदेशानंतर पंधरा दिवसांच्या महापालिकेने रस्त्यासाठी बांधलेले सर्व साहित्य, तसेच टाकलेला राडारोडा काढून घ्यावा ़आणि त्याचा खर्च महापालिकेनेच करावा, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेस हा रस्ता उखडावा लागणार असून, त्यासाठी केलेला तब्बल १५ कोटी ३४ लाख रुपयांचा खर्च पाण्यात जाणार आहे. नदीपात्राच्या बाजूला बांधण्यात येणाऱ्या या २.३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याविरोधात पर्यावरणतज्ज्ञ सारंग यादवाडकर, अ‍ॅड. असिम सरोदे यांंनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्याच्या पहिल्या सुनावणीत महापालिकेने उर्वरित रस्त्याचे काम पूररेषेबाहेर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच तो इलेव्हेटेड (खांब उभारून पुलासारखा) करावा, असा आदेश न्यायालयाने दिला होता. परंतु महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष करून पूररेषेतच काम सुरू केले. त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान असल्याने याचिकाकर्त्यांनी २९ जानेवारी २0१४ मध्ये न्यायालय अवमानप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी झाली. तसेच महापालिकेने आपले म्हणणेदेखील सादर केले होते. मात्र, न्यायालयाने गेल्या महिन्याभरापासून निकाल राखीव ठेवला होता. तो निकाल आज न्यायालयाने दिला आहे, तर अशा प्रकारे नदीत बांधकामे केल्याने उत्तराखंड, जम्मू काश्मीरप्रमाणे नैसर्गिक आपत्तीला निमंत्रण देता का, अशा शब्दांत लवादाने महापालिकेस खडसावले आहे. याबाबत बोलताना याचिकाकर्ते यादवाडकर म्हणाले की, या रस्त्यासाठी महापालिकेने नदीपात्रात टाकलेले डेब्रिज, राडारोडा, तसेच पूररेषेत बांधण्यात आलेली रिटेनिंग वॉल काढून टाकण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. हे काम महापालिकेने १५ दिवसांच्या आत सुरू करावयाचे आहे. तसेच त्याचा खर्चही महापालिकेने करायचा असून हे काम तीन महिन्यांच्या आत पूर्ण करायचे आहे. तसे न केल्यास ही जबाबदारी पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्याची असेल. असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या कामासाठी सुमारे ३५ हजार ट्रक राडारोडा टाकण्यात आल्याने नदीची वहनक्षमता २५ टक्क्यांनी घटली असल्याचेही यादवडकर म्हणाले. (प्रतिनिधी)