पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात भाडेतत्त्वावर २५ डबल डेकर बस लवकर दाखल होणार आहेत. अत्याधुनिक इलेक्ट्रिक डबल डेकर बस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी संचालक मंडळाकडून मान्यता मिळाली असून, लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यांत पीएमपीच्या ताफ्यात या डबल डेकर बस दाखल होणार आहेत. शहरातील पाच मार्गांवर प्रत्येकी पाच बस धावणार आहेत.
इलेक्ट्रिक डबल डेकर बस चाचणीसाठी सप्टेंबर महिन्यात पुण्यात दाखल झाली होती. त्यानंतर हिंजवडी, भोसरी, कोरेगाव पार्क, विमाननगर व इतर या भागात याची चाचणी घेण्यात आली. दहा दिवस चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता भाडेतत्त्वावर डबल डेकर बस घेण्यासाठी मान्यता मिळाली आहे. त्यानंतर आता निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, या बसला चालक आणि वाहक कंत्राटदार कंपनीकडून पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे सीएनजी बसनंतर आता डबल डेकर बस भाडेतत्त्वावर धावणार आहेत. मुंबईत डबल डेकर बस यशस्वीपणे धावत असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच धर्तीवर पुण्यातही या बस आणण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. संपूर्ण वातानुकूलित व इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर आधारित असलेली ही बस प्रदूषणमुक्त वाहतुकीकडे महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे. पुण्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाहनांच्या संख्येमुळे रस्त्यावरची कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. दोन ते तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया करून जानेवारी महिन्यात या बस दाखल होणार आहेत.
या मार्गावर धावणार डबल डेकर बस
शहरातील हिंजवडी फेज ३ ते हिंजवडी फेज ३ (वर्तुळ), रामवाडी मेट्रो स्टेशन ते खराडी, मगरपट्टा सीटी ते कल्याणीनगर मेट्रो स्टेशन, पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ, देहू ते आळंदी आणि चिंचवड ते हिंजवडी या मार्गांवर या इ-डबल डेकर बस धावणार आहेत.
डबल डेकर बसची वैशिष्ट्ये
- कंपनी : स्विच मोबिलिटी- प्रवासी क्षमता : ६० (बसून), २५ (उभे) एकूण ८५ प्रवासी- आकारमान : उंची ४.७५ मीटर, रुंदी २.६ मीटर, लांबी ९.५ मीटर- किंमत : अंदाजे २ कोटी रुपये
भाडेतत्त्वावर डबल डेकर बस घेण्यासाठी संचालक मंडळाकडून मान्यता मिळाली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पीएमपीच्या ताफ्यात २५ डबल डेकर बस दाखल होणार आहेत. -पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
Web Summary : Pune's transport fleet will add 25 leased electric double-decker buses in January. They will operate on five city routes, enhancing public transport and reducing pollution. The buses have a capacity of 85 passengers.
Web Summary : पुणे के परिवहन बेड़े में जनवरी में 25 पट्टे पर इलेक्ट्रिक डबल डेकर बसें शामिल होंगी। वे सार्वजनिक परिवहन को बढ़ाने और प्रदूषण को कम करने के लिए शहर के पांच मार्गों पर चलेंगी। बसों में 85 यात्रियों की क्षमता है।