शहरं
Join us  
Trending Stories
1
"वक्तव्य होत असतात, राम सर्वांचे आणि राष्ट्र..."; RSS नेते इंद्रेश कुमार यांच्या विधानावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया
2
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार
3
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
4
काँग्रेसच्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल होणार? भविष्यातील रणनीतीच्या दृष्टीने मोठं पाऊल उचलणार
5
PHOTOS : नेपाळच्या 'युवा' संघाचा झंझावात; आफ्रिकेने तोंडचा घास पळवताच अश्रू अनावर
6
WHAT A MATCH! आफ्रिकेला आशियाई संघानं घाम फोडला; मोठा उलटफेर होण्यासाठी १ धाव कमी पडली
7
न्यूझीलंडचा ८८ चेंडू राखून विजय! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण अखेर विजयाचे खाते उघडले
8
कॅलिफोर्नियातील PNG ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा, २० दरोडेखोर आले, दोन मिनिटांत सराफा दुकान साफ केले
9
आजचे राशीभविष्य - शनिवार १५ जून २०२४; यश, कीर्ती आणि प्रतिष्ठेत वाढ होईल, आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल
10
40 ALL OUT! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नवख्या संघाला लोळवलं
11
दहशतवाद्यांचे टार्गेट काश्मीरऐवजी जम्मू, पर्यटकांत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न
12
दीड टक्के मते वाढवा, विधानसभा आपलीच; देवेंद्र फडणवीसांनी दिला विश्वास
13
YO-YO Test मध्ये पास न होणाऱ्यांना संघातून वगळणं चुकीचंच; गंभीरचं रोखठोक मत
14
"ज्यांनी रामाच्या भक्तीचा संकल्प केला ते सत्तेत आणि विरोध करणारे…’’, RSS नेते इंद्रेश कुमार यांचा यूटर्न 
15
भाजप वादग्रस्त विधेयके ठेवू शकते थंडबस्त्यात, संसद अधिवेशनात 'सहमती' हा नवीन मंत्र
16
केंद्र सरकारने काढले नाफेडचे कांदा दरनिश्चितीचे अधिकार
17
परस्पर संवाद, मुत्सद्देगिरीतूनच शांततेचा मार्ग जातो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विधान
18
Chhagan Bhujbal : अजित पवार गटात नाराज,शरद पवारांसोबत पुन्हा परत जाणार का? छगन भुजबळांनी थेटच सांगितलं
19
शीना बोराच्या जळालेल्या हाडांचे अवशेष गायब, हाडे सापडत नसल्याची सीबीआयची कोर्टात कबुली
20
सोशल मीडियावर वाढली अश्लीलता; मुले बिघडली, कुटुंबातील संवाद झाला कमी

पुणे-सातारा रस्त्याने प्रवास नको रे बाबा! जागोजागी खड्डे, वाहनांच्या टायर फुटण्याच्या अनेक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 2:17 PM

खड्ड्यांमुळे दुचाकी, चारचाकी चालकांना रस्त्याने ये - जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतोय

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील धांगवडी ( ता. भोर) येथील आडबल सिद्धनाथ मंदिरासमोरील उड्डाणपुलावर डांबरी रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्यामुळे आणि रस्त्यावरील खड्ड्यांच्या धारदार कडांमुळे अनेक चारचाकी, दुचाकी वाहनांचे रात्री अपरात्री खड्डा न कळल्यामुळे टायर फुटून अपघात होत आहेत. त्यामुळे महामार्गावरील या उड्डाणपुलावर रस्त्याच्या कडेला ३० ते ४० वाहनांचे टायर फुटल्यामुळे आणि जवळ कुठेही टायर दुरुस्ती अथवा बदलण्याची व्यवस्था नसल्याने अनेकांचे हाल होत आहेत.

धांगवडी ( ता. भोर) येथील आडबल सिद्धनाथ मंदिरासमोरील उड्डाणपुलावरील या मुख्य रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्यावरून जाणे म्हणजे जीव मुठीत धरून जाण्यासारखेच आहे. वाहनांचे नुकसान आणि वाढणारा वेळ यामुळे या रस्त्याने प्रवास नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. प्रशासनाला मात्र याचे काहीही सोयरसुतक नाही. धांगवडी उड्डाणपुलाच्या रस्त्यावरील हे खड्डे कधी बुजवणार की मोठा अपघात होण्याची वाट पाहिली जाते आहे अशी टीका करीत अनेक प्रवासी या रस्त्यावरून आता इकडून यायचेच नाही अशी उपरोधिक टोमणे मारत आहेत.             उड्डाणपुलावरील या खड्ड्यांमुळे दुचाकी, चारचाकी चालकांना रस्त्याने ये - जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना दुचाकीधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे नव्या वाहनांचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. पुणे - सातारा - कोल्हापूर - महाबळेश्वर या रस्त्याला नेहमी रहदारी असते. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे दुचाकीस्वारांना रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने दररोज अपघात होत आहेत. येथील नागरिकांचा दररोजचा या रस्त्याने राबता असल्याने पाठीच्या मणक्यांचे आजाराचे दुखणे वाढले आहे.

खराब रस्त्याअभावी वाहने पंक्चर होणे, टायर फुटणे, पाटे तुटणे अशा या तक्रारींमुळे चारचाकी वाहनधारक अक्षरश: धास्तावले आहेत. त्यातच महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले. तरीही नाईलाजाने याच महामार्गाचा वापर करतात. रस्त्याच्या दुरुस्तीअभावी शेतीमाल नेणेही अवघड झाले आहे. या रस्त्याची तातडीने दखल घेत दुरूस्ती करावी अशी मागणी येथील काळूराम महांगरे आणि प्रवासी, शेतकरी वर्ग, विद्यार्थी, नोकरवर्ग, कामगार आदींनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गAccidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका