मद्यप्राशन करून गाडी चालवू नका! लायसन्स रद्द होणार, वर्षभरात साडेसहा हजार चालकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:04 IST2025-05-19T12:03:56+5:302025-05-19T12:04:48+5:30

License Cancelled for Drunk Driving: अल्पवयीन दुचाकीस्वारांवरही कारवाई केली असून, मुलांना वाहने चालविण्यास देणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

Don't drive after drinking alcohol Licenses will be canceled action will be taken against 6,500 drivers in a year in pune | मद्यप्राशन करून गाडी चालवू नका! लायसन्स रद्द होणार, वर्षभरात साडेसहा हजार चालकांवर कारवाई

मद्यप्राशन करून गाडी चालवू नका! लायसन्स रद्द होणार, वर्षभरात साडेसहा हजार चालकांवर कारवाई

पुणे : पोर्शे अपघात प्रकरणानंतर वर्षभरात वाहतूक पोलिसांकडून सहा हजार ६५८ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मद्यपी वाहनचालकांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. कल्याणी नगर येथील पोर्शे अपघात प्रकरणानंतर मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी नाकाबंदीही करण्यात येत आहे.

मद्यपींकडून वाहने भरधाव चालविली जात असल्याने गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. असे अपघात रोखण्यासाठी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. तसेच, अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देणाऱ्या पालकांविरोधातही कारवाईचे आदेश त्यांनी दिले होते.

मे २०२४ ते १ मे २०२५ या कालावधीत वाहतूक पोलिसांनी ६ हजार ६५८ मद्यपी वाहनचालकांविरोधात कारवाई केली. संबंधित वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याचे प्रस्तावही वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविले आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

अल्पवयीन चालकांवर कारवाई...

वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन वाहन चालकांवरील कारवाईही तीव्र केली आहे. पोलिसांनी ८२ अल्पवयीन दुचाकीस्वारांवर केली असून, गंभीर अपघात प्रकरणात मुलांना वाहने चालविण्यास देणाऱ्या आठ पालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Don't drive after drinking alcohol Licenses will be canceled action will be taken against 6,500 drivers in a year in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.