रंगाचे फुगे फोडू नका; टोळक्याची व्यावसायिकाला मारहाण, पोलीस तक्रार केल्यास दुकान जाळण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 09:44 AM2023-03-09T09:44:57+5:302023-03-09T09:50:24+5:30

राग मनात धरून सहा जणांच्या टोळक्याने व्यावसायिकाला कपडे फाडून मारहाण केली

Don't burst the color balloons A gang beat up a businessman threatened to burn the shop if he complained to the police | रंगाचे फुगे फोडू नका; टोळक्याची व्यावसायिकाला मारहाण, पोलीस तक्रार केल्यास दुकान जाळण्याची धमकी

रंगाचे फुगे फोडू नका; टोळक्याची व्यावसायिकाला मारहाण, पोलीस तक्रार केल्यास दुकान जाळण्याची धमकी

googlenewsNext

पुणे/किरण शिंदे : धुलीवंदनाच्या दिवशी दुकानापुढे रंगाचे फुगे फोडू नका असे सांगितल्याचा राग मनात धरून सहा जणांच्या टोळक्याने व्यावसायिकाला कपडे फाडून मारहाण केली. त्यानंतर पोलिसात तक्रार केल्यास दुकान जाळून टाकण्याची धमकी दिली. येरवडा गावठाणात मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रोहन गायकवाड, आदित्य सरोदे, शुभम शिंदे, साहिल उलादरी, मल्लेश यड्रामे, अनिकेत गमरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. व्यावसायिक रितीक गजानन अग्रवाल यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचे येरवडा गावठाणात गौरव जनरल स्टोअर्स आहे. धुलीवंदनाच्या दिवशी आरोपी शुभम शिंदे हा त्यांच्या दुकानापुढे रंगाचे फुगे फोडत होता. फिर्यादींनी त्याला या ठिकाणी फुगे फोडू नका असे म्हणाल्याने आरोपीने इतर साथीदारांच्या मदतीने फिर्यादी यांच्या भावाला मारहाण करत कपडे फाडले. फिर्यादी यांचे आई वडील व काकी हे मध्यस्थी करण्यास आले असता त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यानंतर फिर्यादी हे तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत गेले असता आरोपींनी दुकानावर जाऊन जर पोलिसात तक्रार केली तर दुकान जाळून टाकेल व फायरिंग करेल अशी धमकी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Don't burst the color balloons A gang beat up a businessman threatened to burn the shop if he complained to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.