शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीमध्ये काय 370 कलम लागू आहे का ? मुख्यमंत्र्यांचा पवारांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 13:56 IST

बारामतीमध्ये मुख्यंमंत्र्यांच्या सभेमध्ये झालेल्या गाेंधळाविषयी बाेलताना बारामती मध्ये काय 370 कलम लागू आहे का ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी पवारांना केला.

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पुण्यात शनिवारी आली. त्याआधी बारामती मध्ये ही जनादेश यात्रा गेली. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाबाबत घेतलेल्या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भाषणातून टीका सुरू करताच संतप्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घोषणा सुरू केल्या. या कार्यकर्त्यांच्या दिशेने पाेलीस धावून आल्याने पळापळा झाली. याबाबत आज आयाेजित पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता. बारामतीमध्ये पवारांशिवाय काेणी सभा घ्यायची नाही का ? बारामतीमध्ये काय 370 कलम लागू आहे का ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. 

शनिवारी मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा पुण्यात दाखल झाली. त्याआधी बारामतीमध्ये ही जनादेश यात्रा गेली. तेथे मुख्यमंत्र्यांनी पवारांवर टीका सुरु करताच राष्ट्रवादी समर्थकांनी घाेषणाबाजी सुरु केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला हाेता. याबाबत बाेलताना मुख्यमंत्री म्हणाले, काल विराेध करणारे राष्ट्रवादीचे सात ते आठ लाेक हाेते. बारामतीमध्ये पवारांशिवाय काेणी सभा घेऊ नये का, तिथे काय कलम 370 लागू केले आहे का, की बारामती महाराष्ट्राच्या बाहेर आहे ? लाेकशाहीमध्ये सर्वांना सभा घेण्याचा अधिकार आहे. पवारांच्या प्रत्येक सभेत आमच्या सात ते आठ कार्यकर्त्यांनी घाेषणाबाजी केली तर चालेल का ? पवारांनी आमच्या इकडे यावं, सभा घ्यायला आम्ही त्यांना मदत करु असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

तसेच पवारांच्या एवढी काय पायाखालून जमीन सरकतीये की बारामतीमध्ये मुख्यंमत्र्यांनी सभा घेऊ नये असे त्यांना वाटते असा टाेलाही त्यांनी यावेळी पवारांना लगावला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीPoliticsराजकारण