शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

महिला डॉक्टरांच्या बाथरुममध्ये स्पाय कॅमेरा लावणाऱ्या डॉक्टराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST

पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या बाथरुम व बेडरुममध्ये स्पाय कॅमेरा लावण्यामध्ये एका डॉक्टराचा हात असल्याचे ...

पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या बाथरुम व बेडरुममध्ये स्पाय कॅमेरा लावण्यामध्ये एका डॉक्टराचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी एमडी डॉक्टराला अटक केली आहे.

सुजित आबाजीराव जगताप (वय ४२) असे अटक केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. या डॉक्टरांने स्पाय कॅमेरा बल्ब अमेझॉनवरुन मागवल्याचे तपासात समोर आले आहे. हा प्रकार ६ जुलै रोजी घडला होता.

सुजित जगताप हे एमडी आहेत. त्यांचा हिराबाग येथे क्लिनिग आहे. ते भारती विद्यापीठ परिसरात एका हॉस्पिटलमध्ये लेक्चरला गेले होते.

याप्रकरणी एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टराने फिर्याद दिली होती. ही महिला डॉक्‍टर एका नामांकित महाविदयालयाशी संलग्न रुग्णालयात काम करते. ती रुग्णालयाच्या सर्व्हिस क्वार्टरमध्ये आणखी एका महिला डॉक्‍टरसह राहते. ती मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयातील काम उरकल्यावर फ्रेश होण्यासाठी रुमवर आली होती. यावेळी तीने बाथरुमची लाईट लावली असता ती सुरु झाली नाही. यानंतर बेडरुमची लाईटही सुरु झाली नाही.

त्यामुळे तीने इलेक्‍ट्रीशनला बोलवले. त्याने दुरुस्ती करण्यासाठी बाथरुममधील बल्बचे होल्डर उघडल्यावर, आत स्पाय कॅमेरे, त्याचे मेमरी कार्ड आणि बॅकअप आढळला. यानंतर बेडरुमच्या बल्ब होल्डर खोलले असता तेथेही असाच प्रकार आढळून आला. यानंतर तीने तातडीने धाव घेत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना गेल्या ४ दिवसांपासून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तसेच सुरक्षा रक्षक, फिर्यादी यांना संशय वाटत असलेल्यांकडे चौकशी करत होते. दरम्यान एका सीसीटीव्हीमध्ये डॉ. जगताप कैद झाले होते. त्यांना चौकशीसाठी बोलविल्यानंतर त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.

पोलीस निरीक्षक संगीता यादव यांनी सांगितले की, सुजित जगताप हा न्यूरोलॉजिस्ट आहे. तांत्रिक विश्षलेणाद्वारे पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. आपण हे का केले हे अजूनही तो सांगत नाही.