"तुम्हाला समजते का, तुम्ही कोणाला पत्ता विचारत आहात...! असे म्हणत वकिलाला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 12:12 IST2023-01-09T12:12:35+5:302023-01-09T12:12:41+5:30

आरोपीने मारहाण केल्यावर फिर्यादीच्या पायावरून गाडीचे चाक नेले

Do you understand who you are asking for the address beating advocate in pune | "तुम्हाला समजते का, तुम्ही कोणाला पत्ता विचारत आहात...! असे म्हणत वकिलाला बेदम मारहाण

"तुम्हाला समजते का, तुम्ही कोणाला पत्ता विचारत आहात...! असे म्हणत वकिलाला बेदम मारहाण

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना अनेक खळबळजनक गोष्टी कानावर पडत आहेत. स्वतःच्या श्रीमंतीचा मोठेपणा दाखवण्याजोगी लाजिरवाणी घटना पुण्यात घडली आहे. एका वकिलाने आलिशान कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला पत्ता विचारला म्हणून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जंगली महाराज रस्त्यावरील सुभद्रा हॉटेलच्या समोर हि घटना घडली आहे.     

याप्रकरणी विशाल शंकर सोनवणे (वय 42, तिरुपती टाऊनशिप भैरव नगर धानोरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार एमएच 14 आर एफ 6685 या ऑडी कारवरील चालकाच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांनी डेक्कन परिसरातील सुभद्रा हॉटेल समोर थांबलेल्या एका ओळीतील व्यक्तीला ज्ञानमुद्रा टिटोरियल क्लासचा पत्ता विचारला होता. याचा राग मनात धरून ऑडी चालकाने "तुम्हाला समजते का, तुम्ही कोणाला पत्ता विचारत आहात, आम्ही ऑडी चालवणारे लोक आहोत" असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर कार वेगाने घेऊन जात असताना गाडीचे चाक फिर्यादींच्या पायावरून गेले. यामध्ये फिर्यादी जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Do you understand who you are asking for the address beating advocate in pune