विनाकारण फिरताय का ?; पुणे पोलिसांनी २७० वाहने केली जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 09:14 PM2020-03-31T21:14:30+5:302020-03-31T21:17:24+5:30

लॉक डाऊनच्या काळात अनेकदा विनंती करुनही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने आता पोलिसांनी कायद्याचा बडगा उचलला आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या  लोकांना पोलिसांनी १८८ कलमाखाली कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Do you hangout without reason ?; Pune police seize 240 vehicles | विनाकारण फिरताय का ?; पुणे पोलिसांनी २७० वाहने केली जप्त

विनाकारण फिरताय का ?; पुणे पोलिसांनी २७० वाहने केली जप्त

Next
ठळक मुद्देशहरात १ हजारावर लोकांना १८८ खाली नोटीसाविनाकारण फिरताय का ?; पुणे पोलिसांनी २७० वाहने केली जप्त

पुणे : लॉक डाऊनच्या काळात अनेकदा विनंती करुनही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने आता पोलिसांनी कायद्याचा बडगा उचलला आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या  लोकांना पोलिसांनी १८८ कलमाखाली कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच गेल्या दोन दिवसात वाहतूक पोलिसांनी २७० वाहने जप्त केली आहे.
शहर पोलीस गेले आठवडाभर लोकांना घराबाहेर पडू नका़ गर्दी करु नका, अशी विनंती करीत आले आहे. मात्र, तरीही लोक पोलिसांचे ऐकण्यात तयार नाहीत. त्यामुळे पोलिसांनी आता कायदेशीर मार्गाचा वापर सुरु केला आहे. अकारण रस्त्यावर येणाºया लोकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे़ ३० मार्च अखेर शहरात ६७७ लोकांविरुद्ध १८८ कलमाखाली नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. आज दिवसभर १३१ जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन दिवसात २७० वाहने जप्त केली आहे. या वाहनचालकांना आता त्यांचे वाहन पुढील १४ दिवस मिळू शकणार नाही. तसेच त्यांना ते वाहन न्यायालयामार्फत सोडवून घ्यावे लागणार आहे. गेल्या दोन दिवसात शहरातील पोलीस ठाण्यांनी ४१७ जणांवर १८८ खाली कारवाई केली आहे.या लोकांवर पोलीस आता न्यायालयात खटला दाखल करणार असून न्यायालयात त्यांना जाऊन शिक्षा अथवा दंडात्मक कारवाई केली जाईल. पोलिसांनी आता लाठीचा प्रसाद देण्याऐवजी कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याने आता कारवाई झालेल्यांना न्यायालयाचे हेलपाटे मारावे लागणार आहे.

Web Title: Do you hangout without reason ?; Pune police seize 240 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.