शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

नवीन कर्ज मागायला गेलो तर बँका दारात पण उभे करत नाहीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 12:41 PM

...तुमच्या सोबत साजऱ्या केलेल्या दिवाळीमुळे कुटुंबाचं दुःखं हलकं झालं..

ठळक मुद्देआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची खंत १७ कुटुंबियांची पुण्यात दिवाळी साजरी

पुणे :  महाराष्ट्रात दुष्काळ उग्र रूप धारण करत आहे.मराठवाड्यात तर तीव्र दुष्काळामुळे यावर्षी पेरणी देखील झाली नाही. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा काही शेतकरी बांधवांना झाला पण असे असले तरी कोणतीच बँक शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी पुढाकार तर सोडाच परंतु, दारात पण उभे करत नाहीत, यातच मग सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते,’अशा हवालदिल शब्दांत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.    नांदेड जिल्ह्यातील १७ आत्महत्याग्रस्त कुटुंबियांंसोबत पुण्यातील ‘भोई प्रतिष्ठान’च्या कार्यकर्त्यांच्या दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमात ‘पुण्यजागर प्रकल्पाच्या’ माध्यमातून भोई प्रतिष्ठान नांदेड जिल्ह्यात अर्धापुर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात पुढे करत आहे. कुटुंबातील मुला-मुलींच्या आरोग्य,शिक्षणाचा खर्च प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जातो.यावर्षी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले, मुली, पत्नी यांच्यासह दहा दिवस आनंदाने पुण्यात दिवाळी साजरी करण्यात आली. निरोपाच्या कार्यक्रमात दिवाळीचा अनुभव सांगताना गणेश म्हणाला, मी जेव्हा माधुरीतार्इंच्या घरी गेलो तेव्हा मला वाटलं की, मी मामाकडेच आलो आहे. आम्ही फटाके फोडले, आळंदीला गेलो, नवीन कपडे घातले, थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद लुटला.याच पार्श्वभूमीवर पुण्यजागर प्रकल्प समनवयक लक्ष्मीकांत मुळे यांनी शासन खूप काही करत आहे, पण शासनाला खूप काही करावं लागलं, अशी टिप्पणी केली. ‘भोई प्रतिष्ठानचे’ मिलिंद भोई  म्हणाले, एक दिवस येईल की, तुम्ही तुमची दिवाळी आनंदाने गावी साजरी कराल आणि आम्ही पुणेकर त्या दिवाळीत सामील होऊ. आमदार मेधा कुलकर्णी यांनी शासनाच्या माध्यमातून कामे करत आहोत, असे सांगितले.भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलींद भोई, विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, अभिनेत्री जयमाला इनामदार, सीआयडी पोलीस अधीक्षक शेषेराव सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजीराव पवार, सप महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेटे प्रसंगी उपस्थित होते

टॅग्स :PuneपुणेNandedनांदेडfarmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीDiwaliदिवाळी