'आमच्याशी भांडू नको', मुलाला आला राग; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून केला वडिलांचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 13:15 IST2024-10-08T13:14:58+5:302024-10-08T13:15:26+5:30

मुलगा आई वडिलांशी भांडत असताना त्याला दोघांनी समजून सांगूनही त्याने ऐकले नाही

Do not fight with us; The child got angry; Father was killed by hitting a cement block on his head | 'आमच्याशी भांडू नको', मुलाला आला राग; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून केला वडिलांचा खून

'आमच्याशी भांडू नको', मुलाला आला राग; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून केला वडिलांचा खून

दौंड: कौटुंबिक वादातून जीव घेण्यापर्यंतच्या घटना घडू लागल्या आहेत. पती पत्नीच्या वादातही खून झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पण आता दौंड तालुक्यात मुलाचे वडिलांसोबत वैर निर्माण झाल्याचे समोर आले आहे. मुलाने किरकोळ वादावरून बापाचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यासंदर्भांत मुलाच्या आईने पोलिसांना फिर्याद दिली आहे. सुनील रणदिवे यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सचिन रणदिवे (रा. साठेनगर, दौंड) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली. 

सुनील रणदिवे आणि जयश्री रणदिवे हे पती पत्नी आहेत. त्यांचा मुलगा सचिन सोबत वाद सुरु होता. त्यावेळी सचिनला दोघांनी वाद घालू नको म्हणून समजावून सांगितले. परंतु, त्याने वाद घालणे थांबवले नाही. यावेळी मुलाला त्यांनी घराला कुलूप लावून घराबाहेर काढले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुनील रणदिवे घरासमोर झोपले होते. यावेळी मुलगा सचिन याने सिमेंटचा ब्लॉक आणला त्यांच्या डोक्यात घातला. यावेळी त्यांना औषध उपचारासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. यावेळी उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले.

Web Title: Do not fight with us; The child got angry; Father was killed by hitting a cement block on his head