खाकीला डाग लागेल असे काम करु नका : सुबोधकुमार जयस्वाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 07:05 PM2019-11-30T19:05:05+5:302019-11-30T19:10:19+5:30

कम्युनिटी पोलिसिंगमध्ये पुण्यात चांगले काम झाले आहे़..

Do not bad work underpolice uniform :subodhkumar jaiswal | खाकीला डाग लागेल असे काम करु नका : सुबोधकुमार जयस्वाल

खाकीला डाग लागेल असे काम करु नका : सुबोधकुमार जयस्वाल

Next
ठळक मुद्देवाहतूक शाखेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन

पुणे : कम्युनिटी पोलिसिंगमध्ये पुण्यात चांगले काम झाले आहे़. वाहतूक नियमन हे पोलिसांच्या अनेक कामापैकी एक काम आहे़. तेथील काँस्टेबलच सर्वप्रथम नागरिकांशी संपर्कात येतो़. त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे़ तेथे काळजीपूर्वक आणि मेहनतीने काम करावे लागत असून खाकीला डाग लागेल, असे काम करु नका, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी केले़. 
येरवडा येथे उभारण्यात आलेल्या वाहतूक शाखेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन जयस्वाल यांच्या हस्ते शनिवारी झाले़. यावेळी ते बोलत होते़. कार्यक्रमाला अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम, सह आयुक्त डॉ़ रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख तसेच निवृत्त पोलीस अधिकारी उपस्थित होते़. 
सुबोधकुमार जयस्वाल यांनी सांगितले की, कम्युनिटी पोलिसिंगमध्ये पुण्याचे चांगले नाव आहे़. राज्यात दरवर्षी प्राणघातक अपघातात ३० हजार जणांना मृत्यु होतो़. हे प्रमाण कमी करण्याकडे सर्व अधिकाऱ्यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे़. पोलिसांनी प्राणघातक अपघात कमी करण्यासाठी काय केले, यावर सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष आहे़. पुण्यात प्राणघातक अपघाताचे प्रमाण कमी झाले, हे मी राज्यातील पोलीस दलाला उदाहरण देऊन अपघात कमी करण्याचे टारगेट देणार आहे़. सदरक्षणाय खल निग्रहाणाय हे केवळ बीद्र न राहता ते प्रत्येकाच्या मनात असले पाहिजे़. दीक्षांत परेडच्या वेळी जी शपथ घेतो, ती आजसुद्धा माज्या कार्यालयात आहे़ त्या शपथेप्रमाणे आपले काम आहे का हे मी मला विचारतो़. 
विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितले की, महानगर परिवहन प्राधिकरणाच्या  बैठकीत प्रामुख्याने वाहतूकीच्या समस्यांवर चर्चा होते़. जिल्ह्यात वाघोली, चाकण येथे सर्वाधिक कोंडी दिसून येते़ पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी जी मदत पोलिसांना लागेल, ती देण्यास आम्ही तयार आहोत़.                                          
पोलीस आयुक्त डॉ़ व्यंकटेशम यांनी सांगितले की, दहा वषार्पूर्वी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास ३० मिनिटे लागत होती़. २००८ मध्ये कॉम्प्रेहेसिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करण्यात आला होता़. त्यातील बरेच राहून गेले़ मधल्या काळात वाहने वाढली़ पण आपण काही केले नाही़. आता तेवढ्याच अंतरासाठी दीड तास लागतो़ शहरात आता वाहतूकीचा वेग केवळ ताशी १८ किमी इतका आला आहे़. सार्वजनिक वाहतूकीचे प्रमाण हे ५० टक्के इतके असले पाहिजे़ ते आता केवळ १९ टक्के आहे़. यावर्षी ४६ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला़. ६५ टक्के फुटपाथ कमी आहे़. या वर्षभरात प्राणघातक अपघातांचे प्रमाण २४ ते २८ टक्के इतके कमी झाले आहे़.
.............
येथे अस्वच्छता नको
वाहतूक शाखेची इमारत देखणी झाली आहे़. ती अशीच सुंदर ठेवा़ नाही. तर २ महिन्यांनी येथील अस्वच्छतेच्या बातम्या येऊ नयेत, असे सांगून आपल्या हाताने उद्घाटन झालेली वास्तू स्वच्छ ठेवावी, असे जयस्वाल यांनी पंकज देशमुख यांना सांगितले़ही शासनाची जागा पडीक होती़. तत्कालीन वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते व त्यांच्या सहकाऱ्यांनी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवून चिकाटीने ती पुणे पोलिसांसाठी मिळविली़ तसेच वाहतूक शाखा उभारण्यात ज्यांची मोलाची कामगिरी केली़. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, लोहकरे यांचा गौरव करण्यात आला़. 
पुण्यात वाहतूक शाखेत उल्लेखनीय कार्य करणाºया पोलीस उपायुक्तांना या कार्यक्रमासाठी आवर्जुन बोलविण्यात आले होते़े़. 

Web Title: Do not bad work underpolice uniform :subodhkumar jaiswal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.