शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील खळबळजनक घटना! फुरसुंगीच्या कालव्यातून वाहत आले २ मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 13:37 IST

पुरुषाचा मृतदेह काढत असताना महिलेचा मृतदेह वाहत येताना दिसले

ठळक मुद्देमहिलेची ओळख पटली असून तरुणाच्या मृतदेहाची ओळख अजूनही पटलेली नाही

फुरसुंगी: हवेली तालुक्यातील फुरसुंगी गावात कालव्यामध्ये एक पुरुष आणि महिला असे दोन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन्ही मृतदेह कालव्यातून बाहेर काढले. पुरुष मृतदेहाची ओळख पटली नाही, तर स्त्री मृतदेहाची ओळख पटली असून, तो हडपसर- शिंदेवस्ती येथील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

आज्ञा काळूराम घोडेस्वार (वय ५२, रा. शिंदेवस्ती, हडपसर) असे कालव्यात वाहत आलेल्या मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर तरुणाची अद्याप ओळख पटली नसून, याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री एक महिला कॅनॉलमध्ये पडल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. त्याच महिलेचा हा मृतदेह असल्याची प्राथमिक माहिती असून, पुरुष मृतदेहाची ओळख पटलेली नाही. फुरसुंगी येथील कालव्यामध्ये एका पुरुषाचा मृतदेह वाहून आल्याची माहिती लोणी काळभोरपोलिसांनी अग्निशमन दलाला सोमवारी सकाळी दिली. त्यानुसार अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी पोहोचले. जवान आणि परिसरातील कार्यकर्ते बच्चूसिंग टाक यांनी पुरुषाचा मृतदेह बाहेर काढला. त्याचवेळी एका महिलेचाही मृतदेह वाहत येत असल्याचे जवानांना दिसले. त्यांनी महिलेचा मृतदेह देखील बाहेर काढला. दोन्ही मृतदेह लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.घटनास्थळी तात्काळ हडपसर पोलीस व अग्निशमन दल दाखल झाले होते.  मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर काही वेळातच महिलेचाही मृतदेह आढळला. त्यानंतर जवानांनी तोही मृतदेह बाहेर काढला, असे सांगण्यात आले आहे. त्यावेळी तो आज्ञा यांचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान अद्याप त्या तरुणाची ओळख पटलेली नाही. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

शिंदेवस्तीतील महिलेचा मृतदेह 

हडपसर परिसरातील शिंदेवस्ती येथे सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक महिला कालव्यात पडल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानुसार जवानांनी रात्री महिलेचा शोध घेतला होता. मात्र, महिला सापडली नव्हती. मंगळवारी सकाळी फुरसुंगी येथे महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी शिंदेवस्तीच्या घटनेतील महिलेच्या नातेवाईकांना कळवले. त्यांनी ओळख पटवल्यानंतर तीच महिला असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, पुरुष मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

टॅग्स :PuneपुणेhadapsarहडपसरLoni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसDeathमृत्यू