शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

सामान्य कुटुंबातील महिला जिल्ह्याची कारभारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 11:00 PM

सामान्य घटकांचा विकास करणार

ठळक मुद्दे नव्या अध्यक्ष उपाध्यक्षांचा संकल्प

पुणे : घरात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना तसेच राजकारणात सरपंच म्हणून गावगाडा हाकण्याचा अनुभव असणाऱ्या बहूळ (ता. खेड) येथील सर्वसामान्य कुटुंबातील रेटवडी तर्फे पिंपळगाव गटातील राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे या आता जिल्ह्याचा गाडा हाकणार आहेत. अध्यक्षपदाच्या कालावधीत शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित या सर्व घटकांसाठी काम करणार असून त्यांच्या असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही निवडीनंतर अध्यक्ष निर्मला पानसरे आणि उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ७५ जागांपैकी ४४ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष होणार, हे निश्चित होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी जिल्हा परिषदेत पार पडली. यावेळी दोन्ही पदासाठी एक-एक अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाºयांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले. निवडीनंतर मावळे अध्यक्ष विश्वास देवकाते आणि उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी नवनियुक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना निर्मला पानसरे म्हणाल्या, माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला जिल्हा परिषदेच्या अध्यपदाची संधी दिली. हा जिल्ह्यातील सर्व महिलांचा सन्मान आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा येत्या काळात प्रयत्न राहील. पुणे जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहेत. तसेच जिल्ह्यातील तरुण, तरुणी, शेतकरी, आदिवासी नागरिकांच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे. या सोबतच जिल्ह्याचा भौगोलिक विकास आणि आणि प्रत्येक तालुक्याला समान निधी देण्याचाही प्रयत्न करणार असल्याच्या त्या म्हणाल्या. जिल्हा परिषदेच नवनिर्वादित उपाध्यक्ष रणजित शिवतरे म्हणाले, पक्षश्रेष्ठींनी पश्चिम भागातील दोन्ही सदस्यांना संधी दिली आहे. पुणे जिल्ह्याचे आणि शहरालगतचे प्रश्न हे वेगवेगळे आहे. मागील पदाधिकाºयांनी जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केला. येत्या काळात तो आणखी सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाईल. मुद्रांक शुल्काच्या निधीतून जिल्हा परिषदेला प्रामुख्याने उत्पन्न मिळते. मात्र, येत्या काळात उत्पन्नाचे स्रोत आणखी वाढावे लागतील. राज्यात सुदैवाने आमचेच सरकार आहे. त्यामुळे विकासकामांसाठी निधी मिळणार आहे.  चौकट माहेरी आणि सासरी कोणत्याही प्रकारचा वारसा नसताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याचा मान खेड तालुक्यातील बहुळे गावातील एका महिलेला मिळाला आहे़  या महिला आहेत जिल्हा परिषदेच्या सदस्या निर्मला सुखदेव पानसरे़  त्यांचे शिक्षण बी़ए (इंग्लिश) पर्यंत झाले आहे़  २०१२ ते २०१७ या दरम्यान खेड तालुक्यातील बहुळ गावात सरपंच म्हणून काम केले आहे़  २०१७ पासून त्या जिल्हा परिषदेवर सदस्या म्हणून निवडून आल्या तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या देखील आहेत़  पानसरे या त्यांच्या गावामध्ये तसेच मतदारसंघात विविध धार्मिक सोहळ्यांचे आयोजन नेहमीच करतात़  भागवत कथा, शिक्षकांचे सन्मान यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात़  तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना मतदार संघामध्ये यशस्वीरित्या पोहोचविल्या आहेत़   ................जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष रणजित शिवाजीराव शिवतरे यांनी २००६ मध्ये भोर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली़  २००७ साली विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांचा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तीन हजार मतांनी पराभव केला़  त्याचवेळी जिल्हा परिषदेवर सर्वात तरुण व उच्च शिक्षित बांधकाम व आरोग्य सभापतिपदी निवड झाली़  त्यानंतर २०१७ साली पुन्हा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले़ ................  पुणे जिल्हा परिषदेचा असलेला नावलौकिक आणखी वाढवण्यासाठी मी कटिबद्ध असेल. सर्व सहकाºयांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेचे कामकाज करेल. तसेच तळागाळापर्यंत विकासनिधी पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. -निर्मला पानसरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद .....................  पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार होत आहे. तो विकास आराखडा अवलोकनासाठी जिल्हा परिषदेकडे येणार आहे. त्यावेळी सर्वांना विकासात घेऊन आणि जनतेच्या हिताचा विचार करून सूचना हरकती नोंदवू. जिल्हा परिषदेने उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मुंद्राकावर अवलंबून राहून चालणार नाही. जिल्ह्यातील ४९८ पाणी योजनांना गती मिळेल.-रणजीत शिवतरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

.............बहुळ गावात आनंदोत्सव पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निर्मला सुखदेव पानसरे यांची बिनविरोध निवड झाली. खेड तालुक्यातून त्यांच्या निवडीचे स्वागत होत असून अखेर खेड तालुक्याला न्याय मिळाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषत: बहुळ गावच्या नाव लौकिकात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यापार्श्वभूमीवर प्रारंभी अलंकापुरीत माऊलींच्या संजीवनी समाधीला तसेच बहुळ येथे ग्रामदैवत हनुमान हनुमान महाराजांना पुष्पहार अर्पण फटाक्यांची आतषबाजी तसेच ढोल-ताशांच्या गजरात व गुलाल भंडाºयाची उधळण करत नवनिर्वाचित अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांनी गावातून मिरवणूक काढण्यात आली. खेड तालुक्याच्या वतीने आमदार दिलीप मोहिते पाटील तर बहुळ ग्रामस्थांच्या वतीने सरपंच गणेश वाडेकर यांच्या हस्ते पानसरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.फोटो ओळ : नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार करतांना मावळते अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आमदार दिलीप मोहिते पाटील आणि कार्यकर्ते.

टॅग्स :Puneपुणेzpजिल्हा परिषदWomenमहिला