शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

जिल्हा बँकेकडून आत्तापर्यंत ९३९ कोटीचे खरीप पीक कर्ज वाटप; उद्दिष्टाच्या ५७ टक्के कर्ज वाटप पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 8:52 PM

दरवर्षी जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच पीक कर्ज वाटप करण्यास सुरुवात होते..

ठळक मुद्दे जिल्हा बँकेला सन २०२०-२१ वर्षांसाठी १६५३ कोटी रुपयाचे उद्दीष्ट

पुणे : राज्यात मान्सून दाखल झाला तरी अद्यापही अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेले नाही. परंतु, पुणे जिल्ह्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कोरोनामध्ये देखील खरीप पीक कर्ज वाटपामध्ये आघाडी घेतली असून, आत्तापर्यंत तब्बल ९३९ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. जिल्हा बँकेला सन २०२०-२१ वर्षांसाठी १६५३ कोटी रुपयाचे उद्दीष्ट देण्यात आले असून, यापैकी ५६.८३ टक्के खरीप पीक कर्ज वाटप केले आहे. दरवर्षी जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच पीक कर्ज वाटप करण्यास सुरुवात होते. परंतु यंदा कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात कर्ज वाटप सुरू होताना अनेक मर्यादा आल्या. त्या कर्ज वाटप करताना बँकेमध्ये गर्दी होऊ नये यासाठी देखील दररोज ठराविकच शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचे बंधन घालण्यात आले. तसेच गत वर्षी शासनाने कर्ज माफी केली, पण कोरोनामुळे अनेकांना मार्च अखेर पर्यंत कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या बँके खात्यावर थकबाकी असल्याने नव्याने पीक कर्ज मिळण्यास देखील अडचण निर्माण झाली. यामुळे मान्सून हंगाम सुरू झाला तरी शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिले. परंतु शासनाने सहकारी बँकांसह सर्व राष्ट्रीयकृत बँकांना तातडीने शेतक-यांना पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश दिले. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांत पिक कर्ज वाटपाला गती मिळाली आहे. पुणे जिल्ह्यात एकूण पीक कर्ज वाटपामध्ये ८० ते ९० टक्के वाटा एकट्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आहे. तर अन्य राष्ट्रीयकृत बँकांमधून १० -२० टक्केच पीक कर्ज वाटप केले जाते. पुणे जिल्हा बँकेला सन 2020-21 खरीप हंगामासाठी नाबार्ड बँकेकडून १६५३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी जिल्हा बँकेने आता पर्यंत 939 कोटी म्हणजे ५६.८३ टक्के खरीप हंगमासाठी पीक कर्ज वाटप केले आहे. गत वर्षी ९५० कोटीचे म्हणजे ६६ टक्के खरीप हंगमासाठी पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. ----- यंदा ९५ टक्क्यांपर्यत पीक कर्ज वाटप पुणे जिल्हा बँकेने कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन असताना देखील यंदा पीक कर्ज वाटपामध्ये चांगली आघाडी घेतली आहे. आता पर्यंत ६० टक्क्यांपर्यत पिक कर्ज वाटप केले असून, सप्टेंबर अखेर पर्यंत ९५ टक्क्यांपर्यत पिक कर्ज वाटप करण्यात येईल. पुणे जिल्हा बँकेकडून दर वर्षी ९० टक्क्यांच्या पुढे पीक कर्ज वाटप केले जाते. हेच राष्ट्रीयकृत बँकाकडून केवळ १०-१५ टक्के कर्ज वाटप करण्यात येते. - रमेश थोरात, अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.

टॅग्स :PuneपुणेbankबँकState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी