यावेळी सर्व परिचारिका वर्गाला गिरिराज हॉस्पिटल व्यवस्थापनातर्फे ड्रायफ्रुट्स देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी रुग्णालयाचे प्रमुख हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमेश भोईटे म्हणाले, यावर्षी झालेले विक्रमी हृदयरोग शिबिर, त्यानंतर ४५ बेडचे अद्ययावत कोविड सेंटर व दुर्मिळ अशा शस्त्रक्रिया होण्यात सर्व परिचारिका वर्गाचा सिंहाचा वाटा आहे. प्रमुख पाहुणे डॉ. राहुल मस्तूद व फिजिशिअन डॉ कल्याण नाले यांनी सर्व परिचारिका व त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. गिरिराज संस्थेच्या सचिव निर्मला भोईटे यांनी रुग्णसेवा प्रतिसादाचा आढावा घेऊन सर्व परिचारिकांचे कौतुक केले. हॉस्पिटल व्यवस्थापक प्रशांत भोसले यांनी परिचारिका दिनाचे महत्व व सिस्टर फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचे योगदान विषद केले. या प्रसंगी डॉ. अमृता वाघचौरे यांनी प्रास्ताविक केले.
गिरिराज रुग्णालयाच्या वतीने परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांना ‘ड्रायफ्रूट’चे वाटप केले.
१४०५२०२१ बारामती—०४