अनैतिक संबंधात झाला वाद; महिलेने चावा घेत पाडला तरुणाच्या बोटाचा तुकडा, भवानी पेठेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 14:05 IST2021-08-09T14:05:28+5:302021-08-09T14:05:35+5:30

४५ वर्षाच्या महिलेवर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल

Dispute over immoral relationship; The woman took a bite and dropped a piece of the young man's finger, an incident in Bhavani Peth | अनैतिक संबंधात झाला वाद; महिलेने चावा घेत पाडला तरुणाच्या बोटाचा तुकडा, भवानी पेठेतील घटना

अनैतिक संबंधात झाला वाद; महिलेने चावा घेत पाडला तरुणाच्या बोटाचा तुकडा, भवानी पेठेतील घटना

ठळक मुद्देभांडणे सोडवण्यासाठी केली होती मध्यस्थी

पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरुन सुरु असलेले भांडण सोडविण्यास आलेल्या मुलाच्या बोटाचा करकचून चावा घेऊन महिलेने त्याचा तुकडा पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार भवानी पेठेतील न्यू टिंबर मार्केटमध्ये ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता घडला.

याप्रकरणी ३६ वर्षाच्या तरुणाने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ४५ वर्षाच्या महिलेवर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तरुण आणि महिला हे जवळजवळ राहतात. तरुणाची आई आणि आरोपी महिलेचा पती यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा महिलेला संशय आहे. त्यातूनच महिला आपल्या मुलाला घेऊन तरुणाच्या घरी आल्या होत्या.

दोघे जण तरुणाच्या आईला शिवीगाळ करत होते. त्यांच्यातील भांडणे सोडवण्यासाठी तरुण मध्ये आला. तेव्हा महिलेने तरुणाच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला करकचून चावा घेतला. हा चावा इतका जोरात होता की, त्यात त्यांचा बोटाचा तुकडा जागेवरच पडून ते जखमी झाले. खडक पोलिसांनी गुन्हा दाखल करुन महिलेला अटक् केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक म्हस्के अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Dispute over immoral relationship; The woman took a bite and dropped a piece of the young man's finger, an incident in Bhavani Peth