शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

शिक्षकांना बोर्डाच्या उत्तरपत्रिका घेऊन जाण्यास सवलत; पोलिसांकडून मिळणार पास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 6:47 PM

निकाल लवकर लागण्याची शक्यता संचार बंदीमुळे या उत्तरपत्रिका घरी घेऊन जाणे शक्य होत नव्हते.

ठळक मुद्देसंचारबंदीमुळे या उत्तरपत्रिका घरी घेऊन जाणे होत नव्हते शक्य

पुणे : इयत्ता दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका शाळा व महाविद्यालयांमधून घरी घेऊन जाण्यासाठी शिक्षकांना संचारबंदी मधून विशेष सवलत देण्यात आली आहे. ऑनलाइन पास मिळवूण शिक्षकांना या उत्तरपत्रिका घरी घेऊन येता येणार आहेत. त्यामुळे इयत्ता दहावी-बारावीचा निकाल लवकर लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. तसेच केंद्र व राज्य शासनातर्फे संचारबंदी लागू करण्यात आली.मात्र, यामुळे दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका शाळा-महाविद्यालयांमध्ये अडकून पडल्या. शिक्षकांना घरी उत्तरपत्रिका तपासण्याची सवलत देण्यात आली होती. परंतु, संचार बंदीमुळे या उत्तरपत्रिका घरी घेऊन जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे पुणे विभागीय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पोलीस प्रशासनाकडे याबाबत पत्रव्यवहार केला. इयत्ता दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांना संचारबंदीतून विशेष सवलत मिळावी, असे पत्र पुणे विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव बबन दहिफळे यांनी पोलिसांना दिले होते.त्यावर पोलीस प्रशासनाने शिक्षकांना संचारबंदीतून सवलत देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी डिजिटल पास देण्यात येणार आहे.बबन दहिफळे म्हणाले, शाळांमधून उत्तरपत्रिका घेऊन जाण्यासाठी तसेच तपासलेल्या उत्तरपत्रिका मॉडरेटर कडे देण्यासाठी शिक्षकांनी पोलिसांकडून दिला जाणारा डिजिटल पास घ्यावा. त्यासाठी www.punepolice.in या संकेतस्थळावर जाऊन डिजिटल मास मिळण्याबाबतची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.---------पुणे विभागात इयत्ता बारावीचे सुमारे अडीच लाख विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या सुमारे ८० टक्के उत्तरपत्रिका तपासून झाले आहेत. तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे २ लाख ७५ हजार एवढी आहे. या विद्यार्थ्यांच्या ७० ते ८० टक्के उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. इतिहास विषय वगळता बहुतांश विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे.-बबन दहिफळे ,सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे विभाग

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसexamपरीक्षाTeacherशिक्षकPoliceपोलिस