Join us  

कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला

कोलकाता नाईट रायडर्सने लखनौच्या एकाना स्टेडियमवर धावांचा डोंगर उभा केला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 9:50 PM

Open in App

IPL 2024, Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Live Marathi : कोलकाता नाईट रायडर्सने लखनौच्या एकाना स्टेडियमवर धावांचा डोंगर उभा केला, परंतु हा सामना लखनौ सुपर जायंट्सच्या दोन खेळाडूंमुळेही चर्चेत राहिला. बदली खेळाडू म्हणून आलेल्या कृष्णप्पा गौथमने आंद्रे रसेलचा, तर लोकेश राहुलने श्रेयस अय्यरचा अफलातून झेल घेतला. LSG चा फिल्डिंग कोच जाँटी ऱ्होड्सही हे झेल पाहून चकित झाला. 

सुनील नरीनने ( Sunil Narine) पुन्हा एकदा मैदान गाजवले. त्याच्या ८१ धावांच्या वादळी खेळीने KKR ला २३७ धावांचे डोंगर उभे करून दिले. लखनौच्या एकाना स्टेडियमवर प्रथमच एखाद्या संघाने दोनशेपार धावा केल्या आहेत. सुनील नरीन आणि फिल सॉल्ट ( ३२) यांनी पहिल्या विकेटसाठी ४.२ षटकांत ६१ धावा चढवल्या. नरीन ३९ चेंडूंत ६ चौकार व ७ षटकारांसह ८१ धावांवर बाद झाला. अंगक्रिश रघुवंशीने ( ३२)  चांगली खेळी केली. आंद्रे रसेल ( १२), रिंकू सिंग ( १६) हे अपयशी ठरले. रमणदीप सिंग ( ६ चेंडूंत २५ धावा ) व कर्णधार श्रेयस अय्यर ( २३) यांनी संघाला ६ बाद २३५ धावांपर्यंत पोहोचवले.

 आयपीएलमध्ये १५००+ धावा आणि १५०+ विकेट्स घेणारा सुनील नरीन ( १५०७ धावा व १७६ विकेट्स) तिसरा खेळाडू ठरला. रवींद्र जडेजा ( २८९४ धावा व १६० विकेट्स) आणि ड्वेन ब्राव्हो ( १५६० धावा व १८३ विकेट्स) हे अन्य दोन खेळाडू आहेत. आयपीएलच्या एकाच पर्वात सर्वाधिक ६ वेळा २०० पार धावा करणारा KKR हा दुसरा संघ ठरला. यापूर्वी मुंबई इंडियन्सने २०२३ मध्ये हा पराक्रम केला होता. या सामन्यात युधवीर सिंग हा कन्कशन सबस्टीट्यूट म्हणून मैदानावर आला. मोहसिन खान झेल घेताना डोक्यावर आपटला आणि त्याच्याजागी युधवीर आला. आयपीएल इतिहासातील तो दुसरा कन्कशन सबस्टीट्यूट ठरला. मागच्या वर्षी क्वालिफायर २ मध्ये इशान किशनच्या जागी विष्णू विनोद आला होता.  

टॅग्स :आयपीएल २०२४लोकेश राहुललखनौ सुपर जायंट्सकोलकाता नाईट रायडर्स