कोरोनाला रोखण्यासाठी घोटवडेत आपत्ती व्यवस्थापन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:09 IST2021-04-13T04:09:13+5:302021-04-13T04:09:13+5:30

सभेमध्ये संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी तीन शाळांच्या इमारतीची निवड केली तसेच दुकानदार व्यवसायिक यांना शासनाने दिलेल्या वेळेतच ...

Disaster management meeting in Ghotwad to prevent Corona | कोरोनाला रोखण्यासाठी घोटवडेत आपत्ती व्यवस्थापन बैठक

कोरोनाला रोखण्यासाठी घोटवडेत आपत्ती व्यवस्थापन बैठक

सभेमध्ये संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी तीन शाळांच्या इमारतीची निवड केली तसेच दुकानदार व्यवसायिक यांना शासनाने दिलेल्या वेळेतच दुकाने उघडणे व बंद करणे, गर्दी न करणे, शासकीय नियम पाळणे बंधनकारक राहील नियमाचे उल्लंघन केल्यास दुकाने सील केली जातील परिसरात जंतुनाशक फवारणी सुरू असून ती कायम ठेवणे, सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी असेल, अंत्यविधी, दशक्रियासारखे विधी कमीत कमी लोकांनी करावे, गर्दी करू नये आदी बाबत सूचना करण्यात आल्या.

यावेळी गट विकास अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास भेट लसीकरणाची पाहणी केली. त्यामध्ये एप्रिल २०२१ मध्ये ९०० नागरिकांचे लसीकरण झाले व ते सुरूच राहील त्यावेळी शासकीय नियमाचे पालन करून लसीकरण चालू ठेवावे असे सांगितले. कार्यक्रमास गट विकास अधिकारी संदीप जठार, आरोग्य अधिकारी डॉ दीपाली कांबळे, ग्रामविकास अधिकारी राजाराम काशीलकर, सरपंच स्वाती भेगडे, उपसरपंच भीमाजी केसवड, ग्रामपंचायत सदस्य राजाराम शेळके, भाग्यश्री देवकर, सारिका खाणेकर, भोर विधानसभा संघटक (शिवसेना) प्रकाश भेगडे, संतोष गोडाबे, प्रो. पा. किरण शेळके, दीपक मातेरे, सविता आम्राळे, सुनील माकर, आशा वर्कर, अंगणवाडी शिक्षिका व सहायिका, ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री देवकर सारिका खाणेकर उपस्थित होते.

Web Title: Disaster management meeting in Ghotwad to prevent Corona