पुणे : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता स्थानिक पातळीवरही बसू लागल्या आहेत. गॅसच्या संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील गॅस दाहिन्या बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामुळे शहरातील वैकुंठ स्मशानभूमीवर इतर स्मशानभूमींमधील एकूण १८ गॅस दाहिन्या पुढील आदेश येइपर्यंत बंद राहणार आहेत.
महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षणांचा मोबदला देऊन १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मूळ हद्दीसह नवीन समाविष्ट गावांमध्ये स्मशानभूमी व दफनभूमी आहेत. यामध्ये पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी शेड, विद्युत दाहिन्या, गॅस दाहिन्यांसह मुस्लिम, ख्रिश्चन आणि लिंगायत समाजासाठी विविध ठिकाणच्या दफनभूमी याचा समावेश आहे. नागरिकांना जवळच्या परिसरात अंत्यसंस्काराची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शहराच्या सर्वच भागात स्मशानभूमी व दफनभूमींची निर्मिती करण्यात आली आहे.
दरम्यान, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असून, त्याचा परिणाम भारतातील एलपीजी गॅस पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे व्यावसायिक स्वरुपाच्या गॅस वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. घरगुती गॅसच्या बुकिंगमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. आता या गॅस टंचाईचा फटका पुण्यातील अंत्यसंस्कार व्यवस्थेलाही बसू लागला आहे. दोन दिवसांपासून शहरातील वैकुंठ स्मशानभूमीसह इतर स्मशानभूमींमधील गॅस दाहिन्या बंद आहेत.
वैकुंठ स्मशानभूमीतील तीन गॅस दाहिन्या बंद असून, शहरातील इतर भागांतील एकूण १८ गॅस दाहिन्या सध्या कार्यरत आहेत. या गॅस दाहिन्या सुरू ठेवण्यासाठी व्यावसायिक पद्धतीने गॅस खरेदी करावा लागतो. मात्र, शासनाने काढलेल्या आदेशामुळे आता व्यावसायिक गॅसपुरवठा होत नसल्याने या गॅसदहिन्या बंद ठेवण्यात आल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांनी सांगितले.
वैकुंठ स्मशानभूमी ही शहरातील सर्वांत मोठी आणि अत्याधुनिक सुविधा असलेली स्मशानभूमी मानली जाते. येथे दररोज मोठ्या संख्येने अंत्यसंस्कार केले जातात. पर्यावरणपूरक आणि जलद अंत्यसंस्कारासाठी गॅस दाहिन्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, गॅसचा पुरवठा खंडित झाल्यामुळे या सुविधा तात्पुरत्या बंद ठेवण्याची वेळ आली आहे. यामुळे आता येथे विजेवर चालणाऱ्या ५ दाहिन्यांवरील ताण वाढणार आहे.
गॅस पुरवठा सुरळीत झाल्यानंतर गॅस दाहिन्या तातडीने सुरू करण्यात येतील. तसेच गॅस उपलब्धतेबाबत संबंधित पुरवठादार कंपन्यांशी सातत्याने संपर्क ठेवून परिस्थिती लवकर सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - मनीषा शेकटकर, विभागप्रमुख, विद्युत विभाग, महापालिका
अंत्यसंस्कारांसाठी करावी लागणार प्रतीक्षा
गॅस दाहिन्या बंद असल्यामुळे सध्या पारंपरिक लाकडी चितांवर अंत्यसंस्कार करण्याचा पर्याय वापरला जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेची अंत्यसंस्कारासाठीची व्यवस्था - विद्युत दाहिन्या – १०
- गॅस दाहिन्या – १८- विद्युत गॅस (हायब्रीड) – १
- पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी - ३४ ठिकाणी ११२ शेड (३३ शेडमध्ये हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा)
येथील गॅस दाहिन्या बंद राहणार
विश्रांतवाडी स्मशानभूमी - १
कोरेगाव पार्क स्मशानभूमी - १वडगाव शेरी स्मशानभूमी - १
बोपोडी स्मशानभूमी - २औंध स्मशानभूमी - २
पाषाण स्मशानभूमी - १वडगाव धायरी स्मशानभूमी - १
धनकवडी स्मशानभूमी - १कात्रज स्मशानभूमी - २
अमरधाम स्मशानभूमी, हडपसर - १वानवडी स्मशानभूमी - १
मुंडवा स्मशानभूमी - १वैकुंठ स्मशानभूमी - १
बिबवेवाडी स्मशानभूमी - २
Web Summary : Pune's crematoriums are facing gas shortages due to the ongoing conflict, leading to the closure of gas-powered crematories. This will increase the burden on electric crematories and traditional methods, potentially causing delays in funeral services. Alternatives are being explored.
Web Summary : अमेरिका-इज़राइल-ईरान संघर्ष के कारण पुणे के श्मशान घाट गैस की कमी का सामना कर रहे हैं, जिससे गैस से चलने वाले श्मशान घाट बंद हो रहे हैं। इससे बिजली के श्मशान घाटों और पारंपरिक तरीकों पर बोझ बढ़ेगा, जिससे अंतिम संस्कार सेवाओं में देरी हो सकती है।