Video: डिंभे धरणाचे तीन दरवाजे उघडले; अडीच हजार क्युसेक्सने पाणी सोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 14:22 IST2022-08-11T14:14:05+5:302022-08-11T14:22:26+5:30
डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून संतत धार पाऊस सुरू

Video: डिंभे धरणाचे तीन दरवाजे उघडले; अडीच हजार क्युसेक्सने पाणी सोडले
डिंभे/ घोडेगाव : साडे तेरा टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे डिंभे धरण ९२ टक्के भरले असून धरणाचे तीन दरवाजे आज १२.४५ वाजता उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून २५२० क्युसेक्स एवढ्या गतीने पाणी बाहेर सोडण्यात येत आहे. धरणाची पाणीपातळी वाढल्यास अधिक जलद गतीने पाणी बाहेर सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. नदी काठच्या गावांना कालपासूनच सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
पुण्यातील डिंभे धरणाचे तीन दरवाजे उघडले #rain#dampic.twitter.com/rtVtjnqxZj
— Lokmat (@lokmat) August 11, 2022
डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून संतत धार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणात अतिशय जलद गतीने पाणी जमा होत आहे. काल ८६ टक्के असणारा पाणीसाठा आज ९२ टक्के झाल्याने दुपारी साडे बारा वाजता धरणाचा पहिला दरवाजा उघडण्यात आला. लागोपाठ धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून सध्या अडीच हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. यावेळी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. घोडेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन माने यांनी या वेळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला.