यवत येथे डिझेल चोरणारे अखेर जेरबंद; २ चारचाकी वाहनासहित ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 05:23 PM2021-06-14T17:23:09+5:302021-06-14T17:52:59+5:30

सहा जण पोलिसांच्या ताब्यात, माहिती मिळताच सापळा रचून केली कारवाई

Diesel thieves finally arrested at Loni Kalabhor; 4 lakh including 2 four wheelers confiscated | यवत येथे डिझेल चोरणारे अखेर जेरबंद; २ चारचाकी वाहनासहित ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

यवत येथे डिझेल चोरणारे अखेर जेरबंद; २ चारचाकी वाहनासहित ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपींनी यवतमध्ये दोन ठिकाणी तब्बल एक लाखाचे डिझेल चोरले

यवत: स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने डीझेल चोरांची टोळी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्याकडून दोन ४ चाकी वाहनासह ४ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी दत्ता विनोद रणधीर ( वय २२ ), राहुल उर्फ दगड्या मारुती मदने ( वय २७ ), वैभव राजाराम तरंगे ( वय १९ ), प्रतीक बन्सीलाल तांबे ( वय २६, चौघे रा. दत्तवाडी, उरुळी कांचन ), स्वरूप विजय रायकर ( वय २३, रा. सूर्यवंशी मळा, अष्टापुर फाटा,  ता.हवेली ) व धर्मेंद्र कुंडलिक टिळेकर (वय ३४, रा. टिळेकर वाडी, ता. हवेली ) या सहा जणांना अटक करून यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुन रोजी यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीत नांदूर येथील एका कंपनी समोरच्या पार्किंगमधून डिझेल चोरीला गेल्याची घटना घडली होती. ५ ट्रक मधून सुमारे ८३ हजारचे डिझेल गेल्याचे समोर आले होते. तसेच ११ जूनला पारगाव येथील एका ट्रक मधूनही २५ हजार रुपये किंमतीचे डिझेल चोरीस गेले होते. हे दोन्ही गुन्हे यवत पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आले होते. 

सदर गुन्ह्याचा तपास पोलिसांनी सुरु केला. कोणताही पुरावा मिळत नसल्याने गोपनीय खबऱ्यामार्फ़त उरुळी कांचन परिसरातील काही संशयित इसमांची नावे समोर आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर माहितीची खात्री करून उरुळी कांचन परिसरातील दत्तवाडी या ठिकाणी गेले. त्यानंतर सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले. 

चौकशीत त्यांनी कार घेऊन  रात्रीच्या डिझेल चोरल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून ४ लाख ८० हजारांच्या दोन कार, १० हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ४ लाख ९० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  आरोपी आणि मुद्देमाल पुढील तपासासाठी यवत पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहेत.

Web Title: Diesel thieves finally arrested at Loni Kalabhor; 4 lakh including 2 four wheelers confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.