धनकवडीत तलवार घेऊन दहशत माजवत गाडया फोडणाऱ्याला ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 17:31 IST2021-07-01T17:31:03+5:302021-07-01T17:31:11+5:30
आरोपीने अगोदरही स्वतःच्या भावाच्या गाडीवरही दगडफेक केली होती

धनकवडीत तलवार घेऊन दहशत माजवत गाडया फोडणाऱ्याला ठोकल्या बेड्या
धनकवडी: तलावर घेऊन दहशत पसरवत गाड्यांची तोडफोड करणाऱ्याला अटक करण्यात आली असून ही कारवाई भारती विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकाने केली आहे. नवनाथ विठठल घाडगे, वय २४, वर्षे, राहणार आंबेगाव पठार, साईसिध्दी चौक असे अटक आरोपीचे नाव आहे.
भारती विदयापीठ पोलीस स्टेशनच्या पोलिसांना माहिती मिळाली कि, चिंतामणी ज्ञानपीठ चौकात हातामध्ये तलवार घेऊन एक व्यक्ती फिरत आहे. त्यांच्या हातामध्ये लोखंडी तलवार होती. ती जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडे गुन्हयाच्या अनुषंगाने अधिक तपास केला असता त्याने २६ जूनला आंबेगाव पठार येथे रस्त्यावरील चारचाकी गाडीच्या काचा फोडून गाडीचे नुकसान केले होते. त्याबाबत भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुन्हा दाखल होता. त्या गुन्हयामध्ये त्यास अटक करण्यात आलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार नवनाथ व त्याच्या भावाची रहात्या सोसायटीच्या परिसरात भांडणे झाली होती. यावेळी त्याने भावावर दगडफेक केली. हे दगड लागून त्याच्या भावाच्या गाडीचे नुकसान झाले होते. त्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होती. त्याअनुषंगाने तपास करत असतानाच आरोपी तलवार घेऊन दहशत पसरवत असल्याचे समजले. त्याने तलवार घेऊन स्टेटसही ठेवले होते.