शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वाळूच्या १० बोटी उद्ध्वस्त

By admin | Updated: June 24, 2016 02:00 IST

उजनी पाणलोट क्षेत्रातील कालठण नं. १ ते पडस्थळ दरम्यानच्या नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटींवर महसूल विभागाच्या पथकाने हल्लाबोल करून जिलेटिनच्या स्फोटाद्वारे १० बोटी उद्ध्वस्त

इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रातील कालठण नं. १ ते पडस्थळ दरम्यानच्या नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटींवर महसूल विभागाच्या पथकाने हल्लाबोल करून जिलेटिनच्या स्फोटाद्वारे १० बोटी उद्ध्वस्त करून टाकल्या. तहसीलदार वर्षा लांडगे यांच्या नेतृत्वाखालील मंडलाधिकारी संतोष अनगरे, तलाठी मदन भिसे, राहुल पारेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. वाळू उपशाचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे कारवाईचा वेग वाढविण्यात येणार आहे. ती निरंतर चालू राहणार आहे, असे तहसीलदार लांडगे यांनी सांगितले. मात्र, महसूल विभागाचे कर्मचारीच वाळू व्यावसायिकांत सामील असावेत, असा संशय बळावतो, अशी स्थिती आहे. कालठण नं. १ ते तरटगावपर्यंतच्या पाणलोट क्षेत्रातील नदीपात्रात रात्री सातपासून पहाटेपर्यंत सुमारे २५० ते ३०० ट्रक वाळू वाहून नेली जाते. ७० ते ८० यांत्रिक बोटी अहोरात्र वाळूउपसा करत असतात. आजच्या कारवाईत दहा बोटी उडवल्या, तर ४० ते ५० बोटी पळाल्या आहे. तर, मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक झाली तरी महसूल वा पोलीस यंत्रणेच्या हाती केवळ तीन ते सहा वाहने सापडतात. पाणलोट क्षेत्राच्या पट्ट्यालगत सुमारे ३६ किलोमीटरचा पुणे-सोलापूर महामार्ग आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवरचे चालक कितीही चलाख असले, तरी ते महसूल व पोलीस यंत्रणेच्या डोळ्यांत सर्वकाळ धूळ टाकूच शकत नाहीत. (वार्ताहर)