उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार जिल्हा परिषदेत आज आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST2021-02-05T05:11:53+5:302021-02-05T05:11:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री शुक्रवारी (दि. २९) ...

Deputy Chief Minister Ajit Pawar will take stock in the Zilla Parishad today | उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार जिल्हा परिषदेत आज आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार जिल्हा परिषदेत आज आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री शुक्रवारी (दि. २९) जिल्हा परिषदेला भेट देणार आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात येणार आहे. या भेटीत ते विकासकामांच्या आढावा घेण्याबरोबर इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. यानंतर दोन महिन्यांतच कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात लागलेल्या संचारबंदी आणि त्यात निधी नसल्याने पदाधिकारी कोरोनाच्या कामातच अडकले. आता विकासकामांना सुरुवात झाली असून, निधी मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, नवीन पदाधिकाऱ्यांकडे आता केवळ अकरा महिने राहिले. या अकरा महिन्यांत जिल्ह्याच्या विकासकामाला गती देणे हीच पदाधिकाऱ्यांची खरी परीक्षा आहे. त्यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत जिल्हा परिषद कामकाजाचा आढावा घेणार आहे.

पवार यांच्या कामाची पध्दत लक्षात घेता, सर्व विभागाकडून माहिती गोळा करून त्याचे सादरीकरण करण्याची तयार दिवसभर सुरू होती. यावेळी पूर्व उच्च प्राथमिक/पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षातील यशस्वी विद्यार्थ्यांना पवार यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित असणार आहेत.

Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar will take stock in the Zilla Parishad today