एचआयव्ही बाधित पतीकडून शारीरिक सुखाची मागणी; नकार देणाऱ्या पत्नीवर चाकूने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 12:43 IST2023-01-26T12:41:38+5:302023-01-26T12:43:34+5:30

लग्नानंतर पतीस एचआयव्ही असल्याचे समजल्यानंतर, पत्नी पुण्यात माहेरी येऊन विभक्त राहत होती

Demanding physical pleasure from an HIV-infected husband; Knife attack on wife who refused | एचआयव्ही बाधित पतीकडून शारीरिक सुखाची मागणी; नकार देणाऱ्या पत्नीवर चाकूने हल्ला

एचआयव्ही बाधित पतीकडून शारीरिक सुखाची मागणी; नकार देणाऱ्या पत्नीवर चाकूने हल्ला

बिबवेवाडी : एचआयव्हीबाधित असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माढा परिसरातील एका ३६ वर्षीय पतीने पत्नी शारीरिक सुख देत नसल्याच्या कारणावरून बिबवेवाडी परिसरातील हिरामण बनकर शाळा, सुखसागरनगर येथे २७ वर्षीय पत्नीवर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत पत्नी जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

याप्रकरणी आरोपी पतीविरोधात पत्नीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. सदरचा प्रकार २३ जानेवारीला घडला. तक्रारदार महिला ही आरोपीची पत्नी आहे. लग्नानंतर पतीस एचआयव्ही असल्याचे समजल्यानंतर, पत्नी पुण्यात माहेरी येऊन विभक्त राहत होती. परंतु पती त्यानंतरही पत्नीस सतत फोन करून संपर्क साधत होता. पत्नी शारीरिक सुख देत नसल्याचे आणि सोबत नांदत नसल्याचा राग मनात धरून त्याचेकडील चाकूने पत्नीवर चाकूने हल्ला करून तिला जखमी करून शिवीगाळ करून पसार झाला. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक छाया गादिलवाड करत आहे.

Web Title: Demanding physical pleasure from an HIV-infected husband; Knife attack on wife who refused