शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यातून इंदापूर तालुक्यात पाणी सोडण्याची मागणी : टँकरने पाणीपुरवठा सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 13:12 IST

इंदापूर तहसीलदार व बारामती उपविभागीय अधिकारी यांनीही तलावात पाणी सोडण्याची शिफारस केली आहे.

ठळक मुद्दे खासदार सुळे, आमदार भरणे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कळस : इंदापूर तालुक्यामध्ये या वर्षी पाऊस अत्यल्प झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे खडकवासला कालव्यामधून इंदापूर तालुक्यातील पाझर तलावात तातडीने पाणी सोडण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत आमदार दत्तात्रेय भरणे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी, डाळज, मदनवाडी, कळस, तरंगवाडी, भादलवाडी, अकोले, वडापुरी, झगडेवाडी, बळपुडी, रुई, पोंधवडी या गावांचे पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत पूर्णपणे आटले असून पिण्याचे पाणी पुरवणे शक्य नाही. या गावांच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संबंधित गावालगत असलेल्या तळ्यांमध्ये खडकवासला कालव्यातून तातडीने पाणी सोडण्याबाबत लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. इंदापूर तहसीलदार व बारामती उपविभागीय अधिकारी यांनीही तलावात पाणी सोडण्याची शिफारस केली आहे. याबाबत आमदार भरणे यांनी खासदार सुळे यांच्यासमवेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन सदर मागणीचे लेखी निवेदन दिले.तालुक्यातील तलाव खडकवासला कालव्याद्वारे तातडीने भरण्याची आग्रही मागणी करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याची  मागणी केली आहे. या वेळी पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. डी. चोपडे यांनाही निवेदनाच्या मागणीचे पत्र देण्यात आले. तसेच, या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित तांबिले, हनुमंत वाबळे, दत्तात्रेय घोगरे, झगडेवाडीचे सरपंच अतुल झगडे, वसंत आरडे, लक्ष्मण जगताप आदीं उपस्थित होते......गलांडवाडी, डाळज, मदनवाडी, कळस, तरंगवाडी, भादलवाडी, अकोले, वडापुरी, झगडेवाडी, बळपुडी, रुई, पोंधवडी या गावांचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या गावांच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संबंधित गावालगत असलेल्या तळ्यांमध्ये खडकवासला कालव्यातून तातडीने पाणी सोडण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

 

टॅग्स :IndapurइंदापूरSupriya Suleसुप्रिया सुळेWaterपाणी