दिल्ली-पुणे विमानाला चार तास उशीर; प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 20:49 IST2025-05-22T20:48:32+5:302025-05-22T20:49:16+5:30

दिल्ली येथील एक धावपट्टी व टर्मिनल डेव्हलपिंग कामासाठी बंद करण्यात आले आहे

Delhi-Pune flight delayed by four hours; Passengers in distress | दिल्ली-पुणे विमानाला चार तास उशीर; प्रवाशांचे हाल

दिल्ली-पुणे विमानाला चार तास उशीर; प्रवाशांचे हाल

-अंबादास गवंडी

पुणे :
दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या स्पाइट जेटच्या विमानाला गुरुवारी चार तास उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना दिल्ली विमानतळावर चार तास ताटकळत बसावे लागले. सकाळी नऊ वाजून २० मिनिटांनी उड्डाण होणारे विमान दुपारी दीड वाजता झाले. त्यामुळे पुण्याला येणाऱ्या प्रवाशांना अडचण झाली.

दिल्ली येथील एक धावपट्टी व टर्मिनल डेव्हलपिंग कामासाठी बंद करण्यात आले आहे. त्याचा फटका वारंवार बसत असून, विमान सेवेला अडचणी येत आहेत. कामामुळे दररोज कोणत्या ना कोणत्या तरी विमानाला फटका बसत आहे.

त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. स्पाइट जेट कंपनीचे विमान दिल्लीहून पुण्याला सकाळी सुटणार होते. त्यासाठी प्रवासी दोन तास अगोदर विमानतळावर येऊन बसले होते. परंतु सकाळी नऊ वाजून २० मिनिटे झाली तरी विमान काही सुटले नाही. प्रवाशांना तांत्रिक कारणामुळे विमानाला उशीर होत असल्याचे सांगत दुपारी एक वाजता विमान उड्डाण होईल, असे सांगण्यात आले. पण, शेवटी दुपारी दीड वाजता विमानाचे पुण्याकडे उड्डाण झाले.

Web Title: Delhi-Pune flight delayed by four hours; Passengers in distress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.