शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या संगणक प्रशिक्षण योजनेचा बोजवारा

By admin | Updated: January 17, 2015 00:09 IST

झोपडपट्ट्यांमधील मुलांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन संगणकाचे प्रशिक्षण देण्यासाठी संगणक प्रशिक्षण योजनेची सुरुवात करण्यात आली.

दीपक जाधव, पुणेझोपडपट्ट्यांमधील मुलांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन संगणकाचे प्रशिक्षण देण्यासाठी संगणक प्रशिक्षण योजनेची सुरुवात करण्यात आली. त्याकरिता ९३ लाख रुपये खर्च करून सुसज्ज अशा संगणक प्रयोगशाळा असलेल्या ६ बसची खरेदी करण्यात आली. मात्र, एका बसचा अपवाद वगळता उर्वरित ५ बस व्हेईकल डेपोमध्ये धूळ खात पडून आहेत.संगणकाच्या जोरावर तंत्रज्ञानाने प्रचंड झेप घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येकाने संगणक प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज बनली आहे, या पार्श्वभूमीवर अल्प उत्पन्न गटांमधील, झोपडपट्ट्यांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन संगणक प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली. त्याकरिता संगणक, फर्निचर इत्यादींनी सुसज्ज असलेल्या ६ बसची २००८-०९ मध्ये खरेदी करण्यात आली. त्याकरिता ९३ लाख ७७ हजार रुपये खर्च करण्यात आले.नागरवस्ती विकास योजना या विभागामार्फत ही योजना कार्यान्वित केली जाते. नगरसेवक, स्वयंसेवी संस्था यांना त्या बस चालविण्यास देण्यात आल्या. उपमहापौर आबा बागुल यांनी चालविण्यास घेतलेल्या बसचा अपवाद वगळता इतर सर्व बस गेल्या एक वर्षापासून व्हेईकल डेपोमध्ये धूळ खात पडल्या आहेत. मोठा गाजावाजा करून महापालिकेकडून योजना सुरू केल्या जातात. मात्र, काही दिवसांनी त्या योजनेचा पूर्ण बोजवारा उडतो. योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी याकडे आयुक्त कुणाल कुमार यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी लोकहित फाउंडेशनचे अध्यक्ष अजहर खान यांनी केली आहे.