शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूच्या औषधांचा महापालिकेकडे तुटवडा

By admin | Updated: February 23, 2015 00:19 IST

शहरामध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, महापालिकेसह राज्य शासनाकडे औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

पिंपरी : शहरामध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, महापालिकेसह राज्य शासनाकडे औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. सन २००९ मध्ये या आजाराची तीव्रता वाढून अनेकांचे बळी गेले. यंदा फ्लूची साथ येऊन दीड महिन्यापेक्षा अधिक काळ उलटूनही औषध न मिळाल्याने अनेकांचे बळी जात आहेत. आतापर्यंत ७ जणांचे प्राण गेले आहेत. महापालिकेने त्वरित दक्षता घेऊन पुरेशा प्रमाणात औषधे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. महापालिकेकडे सध्या टॅमिफ्लू गोळ्यांचा मर्यादित साठा आहे. ७५ मिलीच्या ५ हजार ५००, ४५ मिलीच्या १ हजार, तर ३० मिलीच्या ८०० गोळ्या आहेत. सिरपची एकही बाटली पालिकेकडे उपलब्ध नाही. औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभागच चिंतेत आहे. यावर उपाययोजना म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने औषधाच्या ३ हजार बाटल्या खरेदीचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला होता. तातडीने औषधे उपलब्ध करण्यासाठी तो प्रस्ताव मान्य करून चार दिवसांपूर्वी महापालिकेने राज्य शासनाकडे पाठविला. मात्र, राज्यभरातच तुटवडा असल्यामुळे ही औषधे उपलब्ध झाली नाहीत. औषधाअभावी रुग्णाचा जीव जाणार नाही, याची दक्षता म्हणून महापालिकेच्या वतीने ५ हजार गोळ्या खरेदी केल्या आहेत. त्या दोन दिवसांतच मिळाल्या आहेत. खासगी औषधविक्रेत्यांनाही स्वाइन फ्लूची औषधे ठेवण्यासाठी सांगितले असतानाही, ती केवळ दोन ते तीनच ठिकाणी उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी)