शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत पदके कमी

By admin | Updated: June 24, 2014 00:09 IST

राज्यातील अनेक मुले-मुली विविध क्रीडाप्रकार आत्मसात करण्याकरिता उत्सुक आहेत. त्यामुळे त्यांना सुविधा द्यायला हव्या.

अजित पवार : ऑलिम्पिक दिन समारंभपुणे : पूर्वीच्या तुलनेत मैदानांची संख्या कमी होऊ लागली आहे. राज्यातील अनेक मुले-मुली विविध क्रीडाप्रकार आत्मसात करण्याकरिता उत्सुक आहेत. त्यामुळे त्यांना सुविधा द्यायला हव्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार्‍या खेळाडूंची संख्या कमी असल्याने देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत पदके कमी मिळत आहेत, अशी खंत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे ऑलिम्पिक दिनानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी असोसिएशनचे महासचिव प्रा. बाळासाहेब लांडगे, बाळकृष्ण अकोलकर, मनोज पिंगळे, बंडा पाटील, निखील कानिटकर, धनराज पिल्ले, गोपाळ देवांग, शांताराम बापू, श्रीरंग इनामदार, रणजित जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमात ऑलिम्पिकपटू, ध्यानचंद व अर्जुन पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. पवार म्हणाले, विविध क्रीडाप्रकार शिकून आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरिता नव्या पिढीने लक्ष घातले आहे. परंतु मोठ्या प्रमाणात कष्ट करण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये जगातील आर्थिक महासत्तांचे वर्चस्व होते. परंतु, भारत आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत आहे. आश्वासक दिशेने पाऊल पडत असल्याने वाव आहे. सत्काराला उत्तर देताना पिंगळे म्हणाले, क्रीडापटूंना जिल्हा आणि स्थानिक पातळीवरुन योग्य मदत मिळायला हवी. तरच चांगले ऑलिम्पिकपटू तयार होऊ शकतील. ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेण्यास कमी प्रमाणात क्रीडापटू पुढे येत आहेत. ती संख्या वाढविण्याचे प्रयत्न व्हायला हवे. कार्यक्रमात ९ मिनिटांत २६५ आसने घालून चिमुकल्या क्रीडापटूंनी उपस्थितांना आश्चर्यचकीत केले. तसेच र्ि‍हदमिक जिम्नॅस्टिक आणि शरीर सौष्ठव करणार्‍यांनी केलेले सादरीकरण आकर्षण ठरले. डॉ. उदय डोंगरे यांच्या क्रीडा पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रा. बाळासाहेब लांडगे यांनी प्रास्ताविक केले. दिनेश पांडे यांनी सूत्रसंचालन केले.