शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

मोदी लाट आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांमुळेच पिंपरी महापालिका निवडणुकीत पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 6:00 PM

पिंपरी चिंचवड शहरातील ढेपाळलेली राष्ट्रवादी काँग्रेस ऍक्टिव्ह करणे गरजेचे:अजित पवार

पिंपरी : मोदी लाट आणि विरोधकांनी केलेल्या खोट्या आरोपांमुळे महापालिका निवडणुकीत २०१७ ला पराभव पत्करावा लागला. महापालिकेतील बहुमताच्या जोरावर चुकीची कामे सुरू आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. महापालिकेची निवडणूक २०२२ ला होणार असून ढेपाळलेली संघटना अ‍ॅक्टिव्ह करणे गरजेचे आहे. मागील चुका टाळून कामाला लागा, असेही आवाहन त्यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व नगरसेवकांची बैठक चिंचवडगावातील रामकृष्ण मोरे सभागृहात झाली. या वेळी कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, विरोधीपक्षनेते पक्षनेते राजू मिसाळ उपस्थित होते.

पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालीकेेत अनेक वर्ष राष्ट्रवादीची सत्ता होती. आज जो काही शहरात विकास पाहायला मिळतोय तो राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला आहे. आम्ही सत्तेचा कधीही गैरवापर केला नाही.उलट सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताचेच सर्व विकास कामे मार्गी लावली. मात्र भाजप सत्तेवर आल्यापासून अनेक प्रकारे भ्रष्टाचार सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही वर्षात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. वाहने जाळणे, तलवारी घेऊन फिरणे, दहशत माजविणे असे प्रकार समोर येत आहेत. पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करताना आदरयुक्त दबदबा निर्माण केला पाहिजे. गुंडगिरी मोडीत काढताना कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य ते निर्णय घ्यायला हवेत असेही पवार यावेळी म्हणाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारElectionनिवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस