शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

धबधब्याच्या कपारीत मिळाला दीपकचा मृतदेह

By admin | Updated: June 28, 2015 00:21 IST

भीमाशंकर अभयारण्यातील कोंढवळच्या धबधब्यावर बांधलेल्या झुलत्या पुलावर पडलेला मंचर येथील दीपक शंकर खानदेशी या युवकाचा मृतदेह

घोडेगाव : भीमाशंकर अभयारण्यातील कोंढवळच्या धबधब्यावर बांधलेल्या झुलत्या पुलावर पडलेला मंचर येथील दीपक शंकर खानदेशी या युवकाचा मृतदेह धबधब्याच्या खाली कपारीत ४४ तासांनंतर सापडला. एनडीआरएफच्या जवानांनी तोंडाला आॅक्सिजन मास्क लावून पाण्यात शोध घेतला असता धबधब्याच्या खाली असलेल्या कुंडातील कपारीत दगडांमध्ये त्याचा मृतदेह अडकलेला आढळला. दि. २५ रोजी दीपक खानदेशी व त्यांचे मित्र भीमाशंकर दर्शन घेऊन कोंढवळ परिसरात फिरायला आले. कोंढवळ गावाजवळ प्रसिद्ध चोंडीचा धबधबा आहे. या धबधब्यावर वन्यजीव विभागाने झुलता पूल, रोप वे तयार केला आहे. दीपक या झुलत्या पुलावरून पलीकडे गेला व पुन्हा येत असताना तोल जाऊन पाण्यात पडला. पाण्याच्या प्रवाहाला वेग असल्यामुळे तो उंच धबधब्यावरून खाली पडला. यामध्ये तो धबधब्याच्या बाजूला असलेल्या कपारींमधील दगडांमध्ये जाऊन अडकला. हा अपघात दुपारी ४.३०च्या सुमारास घडला. दि. २६ रोजी मंचर येथील दीपकचे मित्र, ग्रामस्थ, वन्यजीव विभागाचे कर्मचारी व पोलीस यांनी शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा तपास लागला नाही. पोलीस व सर्वच यंत्रणांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण बल म्हणजेच एनडीआरएफच्या टीमला संपर्क साधला होता. या टीमने आज (दि. २७) सकाळी येथे येऊन घडलेल्या घटनेचा आढावा घेतला व सकाळी साडेआकराच्या सुमारास शोधमोहीम सुरू केली. एनडीआरएफचे निरीक्षक महेंद्र कुमार यांच्यासह ३० जवानांनी जॅकेट, ट्यूब, आॅक्सिजन मास्क यांच्या साह्याने पाण्यात शोध सुरू केला. १२.३०च्या सुमारास धबधब्याचे पाणी पडत असलेल्या ठिकाणी कपारीत खोल पाण्यात तैतीफ अहमद या जवानाला त्याचा मृतदेह आढळून आला. बनवारी, राजू भाई या जवानांच्या मदतीने हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. (वार्ताहर)