Pune NCP: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी दीपक मानकर
By राजू हिंगे | Updated: July 6, 2023 18:25 IST2023-07-06T18:24:54+5:302023-07-06T18:25:18+5:30
उपमख्यमंत्री अजित पवार यांनी शहराध्यक्षपदी काम करण्यासाठी दिलेल्या संधीचे मी सोनं करणार - दीपक मानकर

Pune NCP: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी दीपक मानकर
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या पुणे शहराध्यक्षपदी माजी उपमहापौर दीपक मानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मानकर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकतेच मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. त्यात शहरातील आमदार, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून, पवार विरुद्ध पवार असे चित्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करणार याची उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे दीपक मानकर यांची नियुक्ती झाली आहे. शहराध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दीपक मानकर यांना दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी नगरसेवक दत्ता सागरे आदी उपस्थित होते.
संधीचे सोने करीन
राष्ट्रवादीचे नेते, उपमख्यमंत्री अजित पवार यांनी शहराध्यक्षपदी काम करण्याची मला संधी दिली आहे. या संधीचे मी सोन करीन. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष वाढविण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न करणार आहे असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी सांगितले.