शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांच्या क्षेत्रात ऊस लागवडीत घट

By admin | Updated: September 3, 2015 03:07 IST

सलग तीन महिने पावसाने तोंडही न दाखवल्याने नीरा-भीमा खोऱ्यातील साखर कारखाना क्षेत्रातातील ऊस लागवडीत घट झाली आहे. श्री सोमेश्वर, छत्रपती, माळेगाव, नीरा-भीमा

रविकिरण सासवडे, बारामतीसलग तीन महिने पावसाने तोंडही न दाखवल्याने नीरा-भीमा खोऱ्यातील साखर कारखाना क्षेत्रातातील ऊस लागवडीत घट झाली आहे. श्री सोमेश्वर, छत्रपती, माळेगाव, नीरा-भीमा कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उसाची लागवड केलेली नाही. या हंगामात उसाचे २५ टक्के क्षेत्र कमी होणार आहे, तर पुढच्या हंगामात अधिक घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या २०१५-१६ च्या हंगामासाठी ऊस लागवडी जगवायच्या असतील तर वेळेत कालव्याचे आवर्तन मिळण्याची गरज आहे. परंतु, दुष्काळी परिस्थितीमुळे धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित झाल्यास उसाच्या लागवडी जळून जाण्याचाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आहे त्या पाण्याचा काटकसरीने वापर करून शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. त्यासाठी शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात ठिबकचे अनुदान जमा करावे, अशी मागणी कारखानाचालकांनी केली आहे. मागील तीन महिन्यांपासून या भागात पाऊस पडला नसल्याने जिरायती भागाबरोबरच बागायती भागही चिंतेत आहे. तीनही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील अडसाली ऊस लागवडीचे क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत घटले आहे. छत्रपती कारखाना क्षेत्रात १० हजार ८०० एकर क्षेत्रावर लागवड झाली आहे, तर मागील वर्षीच्या तुलनेत छत्रपतीचे १ हजार ४० एकराने क्षेत्र घटले आहे. माळेगावच्या ३१ सप्टेंबरपर्यंत केवळ ८ हजार ५२५ एकरावर लागवडी झाल्या आहेत. तसेच सोमेश्वर कारखान्याचेही १ हजार एकराने यंदाचे लागवड क्षेत्र घटले आहे. सध्या सोमेश्वर कारखान्याच्या १० हजार एकर क्षेत्रावर लागवडी झाल्या आहेत. लागवड क्षेत्र जरी घटले असले तरी सध्या नवीन केलेल्या लागवडी जगवायच्या कशा, असा प्रश्नही ऊस उत्पादकांपुढे उभा राहिला आहे. नीरा-भीमाचे कार्यकारी संचालक बी. बी. नवले यांनी सांगितले, या हंगामात टंचाईचा परिणाम होणार नसला तरी जवळपास २५ टक्के उसाची घट असेल.