शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
4
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
5
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
6
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
7
भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर नाना पाटेकर म्हणाले, "आपल्या लोकांचं रक्त वाहिलं आहे..."
8
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
9
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
10
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
11
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
12
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
13
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
14
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
15
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
16
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
17
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती कृती भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
18
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
19
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
20
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा

राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय अंतिम टप्प्यात! लवकरच भरणार ३ हजार पदांच्या जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 17:35 IST

वित्त विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर येत्या आठवड्याभरात अध्यादेश प्रसिद्ध केला जाणार

ठळक मुद्देप्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत राज्यातील विविध संघटनांकडून मागणी केली जात होती

पुणे : राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे. वित्त विभागाकडून मंजूर मिळाल्यानंतर येत्या आठवड्याभरात ३ हजार ७४ पदांच्या जागा भरण्यासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला जाईल. असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत राज्यातील विविध संघटनांकडून मागणी केली जात होती. गेल्या काही दिवसांपासून प्राध्यापक संघटनांचे पुण्यात उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू होते. आंदोलकांच्या शिष्टमंडळाबरोबर सामंत यांनी रविवारी चर्चा केली. सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सामंत म्हणाले, प्राध्यापक व ग्रंथपालांच्या रिक्त जागा भरण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेतला असून प्राध्यापक भरतीची फाईल अंतिम मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठवण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांची या फाईलवर आठवड्याभरात स्वाक्षरी होईल. त्यानंतर शिक्षण विभागाकडून प्राध्यापक भरतीचा अध्यादेश प्रसिद्ध केला जाईल. त्यामुळे प्राध्यापकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील तासिका तत्त्वावरील धोरण बंद करण्याची मागणी प्राध्यापक संघटनांकडून केली जात आहे. याबाबतचा अभ्यास करण्यासाठी उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, असे नमूद करुन सामंत म्हणाले, तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात २५ टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच युजीसीच्या नियमावलीप्रमाणे ४८ मिनिटांचा एक तास गृहीत धरला जाणार आहे. या वाढीमुळे राज्य शासनावर सुमारे ५१ कोटी ५१ लाख ६० हजार एवढा आर्थिक भार पडणार आहे. 

प्राध्यापक भरतीमध्ये होत असलेल्या गैरव्यवहाराचा बद्दल विचारले असता सामंत म्हणाले, प्राध्यापक भरतीमध्ये गैरव्यवहार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. पूर्वी माझ्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर एका अधिका-याची मी बदली केली आहे.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणProfessorप्राध्यापकUday Samantउदय सामंतStudentविद्यार्थीTeacherशिक्षकcollegeमहाविद्यालयMaharashtraमहाराष्ट्र