पक्षप्रमुखांचा निर्णय मान्यच..! आम्ही प्रामाणिकपणे कामही करु ; फक्त तुम्ही फसवू नका..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 03:27 PM2019-02-20T15:27:31+5:302019-02-20T15:50:39+5:30

राजू इनामदार  पुणे : ‘पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला, एकदम मान्य आहे, लोकसभेत आम्ही प्रामाणिकपणे काम करू, पण तुम्ही विधानसभेला फसवू ...

Decision of party head acceted ..! We will work honestly; but Just do not fool bu you .. | पक्षप्रमुखांचा निर्णय मान्यच..! आम्ही प्रामाणिकपणे कामही करु ; फक्त तुम्ही फसवू नका..

पक्षप्रमुखांचा निर्णय मान्यच..! आम्ही प्रामाणिकपणे कामही करु ; फक्त तुम्ही फसवू नका..

ठळक मुद्देमहापालिकेतही हवा वाटा ; शिवसैनिकांची भावना भावना नाही, आदेश महत्वाचाप्रचाराला बोलावणारे, कार्यक्रमांना मात्र बोलवत नाहीत अशी बहुसंख्य शिवसैनिकांची तक्रारलोकसभेच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरच विधानसभेचा जागा वाटप होण्याची दाट शक्यता

राजू इनामदार 
पुणे : ‘पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला, एकदम मान्य आहे, लोकसभेत आम्ही प्रामाणिकपणे काम करू, पण तुम्ही विधानसभेला फसवू नका’ अशीच युतीनंतर सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना आहे. वेगवेगळो लढलो तरीही आता स्थानिक संस्थांच्या सत्तेतही आम्हाला वाटा हवा, साहेबांनी तशी अट घालायला होती असे त्यांना मनोमन वाटते आहे.
स्वबळाची भाषा करणाऱ्या भारतीय जनता पार्टी व शिवसेना अशा दोन्ही पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर युती झाली आहे. मित्र पक्ष सोडून जात असताना भाजपासाठी ही युती महत्वाची होती, तर राजकीयदृष्ट्या अस्पृश्य व्हायचे नसेल तर भाजपा हाच उत्तम पक्ष आहे असे लक्षात आल्यामुळे शिवसेनेनेही फार ताणून धरले नाही. मात्र नेत्यांमध्ये झालेल्या या युतीच्या निर्णयाचा सामान्य शिवसैनिकांवर काय परिणाम झाला, तो युतीसाठी तयार आहे का आहे याचा कानोसा घेतला असता मात्र त्यांच्यात भाजपाकडून फसवणूक होते हीच भावना असल्याचे दिसते आहे.
शिवसैनिक भाजपा उमेदवाराचा अतीशय मनापासून, भावनेने प्रचार करतात, निवडणूक आहे तोपर्यंत भाजपाच्या नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सगळे गोड बोलतात, पण निवडणूक संपल्यावर एकदम दूर लोटतात असा अनुभव असल्याचे काही शिवसैनिकांनी स्पष्ट केले. गल्लीबोळातील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांना शिवसैनिक नको असतात, ते कार्यक्रम भाजपाचेच होतील यासाठी त्याची सगळी धडपड असते. प्रचाराला बोलावणारे, कार्यक्रमांना मात्र बोलवत नाहीत अशी बहुसंख्य शिवसैनिकांची तक्रार आहे.
लोकसभेच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरच विधानसभेचा जागा वाटप होण्याची दाट शक्यता आहे. आकडेवारी लिहून ठेवण्यात, तिचा दाखला देण्यात शिवसैनिक कमी पडतो. भावनेच्या जोरावर त्याचे काम असते. भाजपाचे लोक मात्र कोणताही प्रभाग शिवसेनेने मागितला तरी तिथे लोकसभेला झालेल्या मतदानाची आकडेवारीच समोर ठेवतात व त्या जागेवर दावा करतात. विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागाच्या मतदानाची सविस्तर आकडेवारी, त्यावरचे निष्कर्ष त्यांच्याकडे लेखी असतात. जागा वाटप चर्चेच्या वेळी ही आकडेवारी दाखवत ते शिवसेनेचा दावा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असतात असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. 
त्यापेक्षाही स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांचा अनुभव फारच विचित्र असल्याचे शिवसैनिक सांगतात. महापालिका निवडणुकांमध्ये त्यांना एकतर शिवसेनेला प्रभाग द्यायचा नसतो, दिला तर ते तेथील उमेदवाराचा प्रचार करतच नाहीत, दुसºया प्रभागात जिथे भाजपाचा उमेदवार असेल तिथेच त्यांचा मुक्काम असतो. आहे की, येतो की, असे दाखवल्यासारखे करत प्रत्यक्ष प्रचारात ते कधीही सहभागी होत नाहीत. शिवसेनेचा कोणीही माणून संघटनात्मक किंवा पदाधिकारी स्तरावर मोठा होऊच द्यायचा नाही असेच त्यांचे धोरण असते असे बऱ्याच शिवसैनिकांनी सांगितले.
गोड बोलणे हा भाजपा कार्यकर्त्याचा तर उसळून भांडणे किंवा एकदम जीवतोड मदत करणे शिवसैनिकांचा स्वभाव आहे. स्वबळावर निवडणूक लढवावी अशीच अनेक शिवसैनिकांची इच्छा होती. नेते मात्र भाजपावर टीका करत असले तरी वास्तवाचाही विचार करत होते. त्यातूनच युती झाली आहे. आदेशावरच शिवसेना चालत असल्याने ती कार्यकर्त्यांनी मान्यही केली आहे. मात्र आम्हाला फसवू नका, वापरू नका, प्रामाणिक रहा असे त्यांचे म्हणणे आहे. 
----------------------------------------------------------
भावना नाही, आदेश महत्वाचा
भावना काहीही असली तरी सामान्य शिवसैनिक काय किंवा शिवसेनेचे पदाधिकारी काय, पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार काम करणार. शिवसेनेत आदेशाचा पायमल्ली चालतच नाही. भाजपाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे, आम्ही त्यांना प्रामाणिकपणे लोकसभेसाठी मदत करणार, विधानसभेचे जागा वाटप हा पुढचा प्रश्न आहे, त्याविषयी आताच बोलणे योग्य नाही.
चंद्रकात मोकाटे, माजी आमदार, शिवसेना शहरप्रमुख

Web Title: Decision of party head acceted ..! We will work honestly; but Just do not fool bu you ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.