शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

डीपीतील घोटाळ््याविषयी आरोपाऐवजी निर्णय घ्या!

By admin | Updated: July 4, 2015 00:30 IST

महापालिकेचा प्रारुप विकास आराखडा(डीपी) घोटाळ््याचे आरोप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो ताब्यात घेतला. मात्र, केवळ घोटाळ््याचे आरोप करून चालणार नाही.

पुणे : महापालिकेचा प्रारुप विकास आराखडा(डीपी) घोटाळ््याचे आरोप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो ताब्यात घेतला. मात्र, केवळ घोटाळ््याचे आरोप करून चालणार नाही. या खात्याचे प्रमुख मुख्यमंत्री असून, त्यांनी चुकीच्या गोष्टी दुरूस्त करण्याचा निर्णय घ्यावा, अशी थेट टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. ठाणे महापालिकेनंतर पुण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी शरद पवार यांनी थेट संवाद आज साधला. त्यावेळी शहराध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, सभागृहनेते बंडू केमसे, आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या प्रत्येक नगरसेवकांने वॉर्डातील प्रगती व अडचणीविषयी माहिती दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ‘‘विकास आराखडा शासनाच्या कोर्टात आहे. आता त्यांनी निर्णय घ्यायचा असून, त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. पुण्याचा मेट्रो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी दिल्लीत बैठक घेवून प्रयत्न करण्यात येणार आहेत. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी उद्योजकांची मदत घेण्यात यावी. तसेच, केवळ एकाच भागात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याऐवजी शहराच्या सर्व दिशेला उभारण्यात यावेत. पाऊस लांबणीवर पडल्यास आवश्यक उपायोजनांसाठी पाटबंधारे विभागाशी महापालिका पदाधिका-यांनी चर्चा करून मार्ग काढावा. एलबीटी रद्दचा निर्ण़याचे परिणाम काय होतात. त्याचे निष्कर्ष पाहून त्यावर भाष्य करण्यात येईल. महापालिकेतील नगरसेवकांच्या कामकाजाचा आणखी तीन महिन्यांनंतर आढावा घेण्यात येईल.’’मेट्रोची अधिवेशनावेळी दिल्लीत बैठक...शहरातील मेट्रो प्रकल्पाविषयी यापूर्वीच्या सरकारकडेही पाठपुरावा केला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबत दिल्लीत बैठक घेण्यात येईल. त्यासाठी महापालिकेचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व सर्वपक्षीय गटनेते, तसेच प्रशासनाचे अधिकारी येतील, असे पवार यांनी सांगितले. पुणे व नागपूर मेट्रो प्रकल्पाविषयी दुजाभाव केला जात आहे का ? असे विचारले. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री व केंद्रीयमंत्री रस्ते विकासमंत्री नागपूरचे आहेत. साहजिक आहे की, तळे राखी तो पाणी चाखी, अशी मराठीत म्हण आहे. मला अधिकार असते, तर पुण्याला झुकते माप मिळाले असते.’’भ्रष्टाराचाराचे आरोप नको...शिक्षण मंडळातील आजी-माजी अध्यक्षांवर शिक्षक बदलीप्रकरणात लाच घेतल्याच्या प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्यामुळे संबंधितांना निलंबित करण्यात आलेले आहे. त्यांच्यावरील दोषारोप निश्चित झाल्यावर कडक कारवाई करण्यात येईल. परंतु, यापुढे कोणत्याही नगरसेवकांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याचे सहन करणार नाही. महापालिकेच्या बांधकाम विभागातील फाईलीसाठी नगरसेवकांकडून अडवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. यापुढे कोणतीही तक्रार चालणार नाही, असा सज्जड इशारा शरद पवार यांनी बैठकीत दिला. ‘‘नगरसेवकांनी केवळ प्रभागात चांगली प्रगती करून चालणार नाही. संपूर्ण शहराच्या प्रश्नांकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. समविचारी काँग्रेस पक्षाला बरोबर घेवून कारभार केली पाहिजे.’’- शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी.