शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाबाबत निर्णय लटकला

By admin | Updated: August 21, 2015 02:37 IST

या गावची ग्रामसभा अनेक मुद्द्यांवरून चांगलीच गाजली. गायरान जमीन, बंदिस्त गटारे, सार्वजनिक रस्ता या विषयांवरून ग्रामस्थांची एकमेकांमध्ये

सोमेश्वरनगर : मुरूम (ता. बारामती) या गावची ग्रामसभा अनेक मुद्द्यांवरून चांगलीच गाजली. गायरान जमीन, बंदिस्त गटारे, सार्वजनिक रस्ता या विषयांवरून ग्रामस्थांची एकमेकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. विशेषत: मुरूम गावाच्या ५२ एकर गायरानावरील अतिक्रमणाबाबत कोणीच निर्णय घेत नाही. त्यामुळे गावकारभाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी गावातील युवकांनी एकत्र येत उर्वरित गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्याचा नवीन फंडा शोधला आहे. नुकतीच मुरूम गावाची ग्रामसभा खंडाजंगी वातावरणात पार पडली. सार्वजनिक रस्ता, बंदिस्त गटारे, तंटामुक्ती अध्यक्ष निवड व गावाची गायरान जमीन याबाबत या सभेत चर्चा झाली. तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले प्रकाश जगताप, हंबीरराव जगताप व दिनकर कदम यांची निवड अशा या गोंधळाच्या वातावरणामुळे झाली नाही. तर दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ता व नीरा नदीवरील पूल अडवणुकीमुळे अजून अपूर्ण आहे. या रस्त्यामुळे गावाचा विकास होणार असेल, तर त्याचे काम होऊ द्यावे, असे मत सोमेश्वरचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी मांडले. यावर सोमेश्वरचे माजी संचालक पी. के. जगताप यांनी मुरूम गावाला असलेल्या ६५ एकर गायरान जमिनीमधील ५० ते ५२ एकर गायरान जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. आठ गटांपैकी ४ गटांची मोजणी होऊन हद्दी कायम झाल्या आहेत. अगोदर गायरान अतिक्रमण काढा, मी रस्त्याला अडचण येऊ देत नाही, असे स्पष्ट केले. मुरूमच्या गायरानाची मोजणी होऊन हद्दी कायम होऊन सहा महिने उलटले; मात्र याबाबत गावकारभारी कोणतेच ठोस पाऊल उचलत नाही. त्यामुळे मुरूमच्या ३० ते ३५ युवकांनी एकत्र येत गायरानाच्या अतिक्रमणाबाबत या गावपुढाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी उरलेल्या गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्याचा नवीन फंडा शोधून काढला आहे. आता तरी हे गावपुढारी पुढे होऊन ५२ एकर क्षेत्रावरील अतिक्रमण काढतील, हा यामागील उद्देश आहे. जर पुढाऱ्यांनी अतिक्रमण काढले नाही, तर चांगलेच आहे. या जमिनी आमच्याच होतील, अशी या युवकांची भूमिका आहे. (वार्ताहर)