मिरवणुकीत नाचताना तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: May 9, 2017 03:35 IST2017-05-09T03:35:18+5:302017-05-09T03:35:18+5:30

ठाकुरपिंपरी (ता. खेड) येथे लग्नाच्या मिरवणुकीत नाचताना चक्कर येऊन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि. ८) घडली आहे

The death of the youth in the procession | मिरवणुकीत नाचताना तरुणाचा मृत्यू

मिरवणुकीत नाचताना तरुणाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
दावडी : ठाकुरपिंपरी (ता. खेड) येथे लग्नाच्या मिरवणुकीत नाचताना चक्कर येऊन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि. ८) घडली आहे. नितीन शंकर बोडके (वय २९) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : लक्ष्मण मारुती भोसले यांचा भाऊ राम भोसले यांचा मुलगा अमोल यांच्या लग्नाची मिरवणूक सकाळी १० वाजता निघाली होती. बेंजो पार्टीपुढे नाचता -नाचता नितीन याला अचानक चक्कर येऊन तो खाली बसला. त्याला तातडीने राजगुरुनगर येथे वाबळे हॉस्पिटल येथे नेण्यात आले होते.
त्या वेळी डॉक्टरांनी नितीन बोडके याला तपासले असता मृत झाल्याचे सांगितले. याबाबत लक्ष्मण भोसले यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: The death of the youth in the procession