सासवड जवळ अपघातात तरूणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 19:17 IST2018-06-14T19:17:35+5:302018-06-14T19:17:35+5:30
सासवड जवळील चंदनटेकडी येथे दुचाकी आणि महिंद्रा जीपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

सासवड जवळ अपघातात तरूणाचा मृत्यू
सासवड : सासवड - हडपसर पालखी महामार्गावर सासवड जवळील चंदनटेकडी येथे दुचाकी आणि महिंद्रा जीपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. संदिप शामराव जगताप (वय ४२, रा. जुने पोस्ट आॅफिस सासवड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत जगताप सासवड येथील हे रेडिटर कंपनीत कामाला असून दुपारी चारच्या सुमारास कंपनीतील काम उरकून सासवडवरून चंदनटेकडी जवळील शेतात आपल्या दुचाकी (एमएच. १२ केबी. २४१०) वरून जात असताना मागून येणा-या महिंद्रा जीप (एम एच १२ जे ४२२५) ने पाठीमागून त्यांना धडक मारून गंभीर जखमी केले. त्यांना उपचारासाठी सासवडच्या संत सोपानदेव हॉस्पिटलमध्ये आणले असता तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत मयत जगताप यांचे बंधू बाळासाहेब शामराव जगताप यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक फौजदार आर.जे. काळभोर पुढील तपास करत आहेत. मयत संदीप जगताप यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.