डंपरच्या धडकेने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू; स्वारगेट परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 16:54 IST2021-04-03T16:54:30+5:302021-04-03T16:54:49+5:30
स्वारगेट परिसरात भरधाव डंपरची धडक बसून दुचाकीवरुन जाणार्या सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला.

डंपरच्या धडकेने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू; स्वारगेट परिसरातील घटना
पुणे : स्वारगेट परिसरात भरधाव डंपरची धडक बसून दुचाकीवरुन जाणार्या सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला. भारती अनंता शिर्के (वय ५५, रा़ पर्वती दर्शन) असे अपघाताील मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. हा अपघातस्वारगेट येथील उड्डाणपुलाजवळ शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला.
याप्रकरणी मयुरी तिखे (रा. पर्वती) यांनी फिर्याद दिली आहे. मयुरी या फार्मासिस्ट आहेत. लॉकडाऊन लागण्याच्या शक्यतेने घरगुती साहित्य, धान्य खरेदीसाठी त्या आत्या भारती यांच्यासमवेत मंडईत गेल्या होत्या. तेथून दुपारी त्या दोघी दुचाकीवरुन घरी परत जात होत्या. शिवाजी रोडवरुन त्या स्वारगेटच्या बाजूने जात असताना उड्डाण पुलाजवळ समोरुन वेगाने आलेल्या डंपरची त्यांना धडक बसली. त्यामुळे दोघी गाडीवरुन फेकल्या गेल्या. मयुरी या किरकोळ जखमी झाल्या. अपघातात भारती गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरु असताना भारती शिर्के यांचा मृत्यू झाला.