शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

शिक्रापूर येथे शेततळ्यात बुडून युवतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 2:45 PM

जवळच असलेल्या शेततळ्यावर पाणी आणण्याकरिता युवती गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परत आली नाही म्हणून कुटुंबियांनी तळ्याकडे धाव घेतली.

ठळक मुद्देधामारी येथील घटना : पाणी आणण्यासाठी गेली असता घडली दुर्घटना 

शिक्रापूर : पाणी आणण्याकरिता गेलेल्या युवतीचा पाय घसरुन शेततळ्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी शिरुर तालुक्यातील धामारी येथे घडली. शिक्रापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. तेजल सुनील वाघमारे (वय १९, रा. धामारी, ता. शिरुर) असे मृत्यूमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजल नुकतीच बारावी उत्तीर्ण झाली होती. तिने पाबळ येथील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता. तिच्या वडिलांचे सहा वर्षांपूर्वी निधन झालेले असून आई चंचला व लहान भावासह ती धामारी येथील दलित वस्तीमध्ये राहत होती. ती रविवारी जवळच असलेल्या शेततळ्यावर पाणी आणण्याकरिता गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परत आली नाही म्हणून कुटुंबियांनी तळ्याकडे धाव घेतली. शोधाशोध करत असताना तिच्या चपला तळ्याच्या कडेला पडलेल्या दिसल्या. पाण्यामध्ये तिचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आले. पोलीस पाटील आत्माराम डफळ यांनी पोलिसांना माहिती दिली. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदानंद शेलार यांच्या सुचनांनुसार हवालदार संजय डावरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेजलचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आला. काही वर्षांपुर्वी येथील हातपंपावर पाणी हापसत असताना भीवाजी मोहिते यांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Shikrapurशिक्रापूरShirurशिरुरDeathमृत्यूWaterपाणी